पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मूल दत्तक घेणं < अनेक समलिंगी व्यक्तींना आपला संसार असावा, आपल्याला मुलं असावीत असं वाटतं. समलिंगी व्यक्तीला किंवा समलिंगी जोडप्याला मूल हवं असेल तर दत्तक घेण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे का? समलिंगी विवाहाला मान्यता नसल्यामुळे समलिंगी जोडप्याला मूल दत्तक घेता येत नाही. 'सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी' मार्गदर्शिका सांगते की ज्या बाहेरच्या देशात समलिंगी विवाहाला मान्यता आहे, तिथल्या समलिंगी जोडप्यांनाही भारतातील मुलं दत्तक देऊ नयेत. [47] भारतातील एकट्या पुरुषाला किंवा एकट्या स्त्रीला मूल दत्तक घेता येऊ शकतं पण अनेकांना असं वाटतं की, समलिंगी व्यक्ती (किंवा समलिंगी जोडपं) मुलांना वाढवायची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू शकणार नाहीत; समलिंगी पालक असलेल्या वातावरणात मुलाची वाढ चांगली होणार नाही. म्हणून बहुतेक दत्तक देणाऱ्या संस्था समलिंगी व्यक्तींना मूल दत्तक देत नाहीत. मला एका संस्थेत सांगितलं गेलं, “आपण मुलांच्या हिताचं काय आहे हे बघितलं पाहिजे. त्यांना जर समलिंगी व्यक्तीनी दत्तक घेतलं तर त्यांची सुदृढ वाढ होणार नाही. म्हणून आम्ही समलिंगी व्यक्तींना मूल दत्तक देत नाही." या उलट मत 'अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन'चं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'पालकांच्या लैंगिक कलावर त्यांच्या पालकत्वाची कुशलता अवलंबून आहे, असा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. गे किंवा लेस्बियन पालक, भिन्नलिंगी पालकांइतकेच आपल्या मुलांना पोषक व सुदृढ वातावरण पुरवू शकतात. संशोधनात दिसून आलं आहे की, मुलांच्या वाढीचा, मानसिक आरोग्याचा व पालकांच्या लैंगिक कलाचा काहीही संबंध नाही व समलिंगी पालकांची मुलं भिन्नलिंगी पालकांच्या मुलांइतकीच सुदृढ होऊ शकतात.' [48] समाजातले समलिंगी लोकांबद्दलचे पूर्वग्रह जोवर दूर होत नाहीत तोवर या विषयाकडं उदारमतवादी दृष्टिकोनातून बघितलं जाणार नाही. समाजात अनेक प्रकारचे लोक आहेत. जबाबदारी मानणाऱ्यातील आहेत, बेजबाबदार वर्तन करणारेही आहेत. दत्तक देताना त्या व्यक्ती/जोडप्याची संपूर्ण माहिती मिळवणं, त्यांची आर्थिक, धार्मिक, लैंगिक, सामाजिक, कायद्याची, वैद्यकीय पार्श्वभूमी समजावून घेणं हे दत्तक देणाऱ्या संस्थांचं काम आहे. पण केवळ ते समलिंगी आहेत म्हणून त्यांना मूल दत्तक द्यायचं नाही हे धोरण त्यांच्यावर व त्या अनाथ मुलावर अन्याय करणारं आहे. काही समलिंगी व्यक्ती विचार करतात की, आपली लैंगिकता लपवून आपण मूल दत्तक घ्यावं. यामागे आपलं मूल असावं ही तळमळीची इच्छा असली तरी या । . ! 1 इंद्रधनु ... ४९