पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

र.धों.कबें, एम. समोर १९५० Rani N,मंडरा विसावे शतक विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातला समाज सनातनी होता. पुरुषांचे आणि स्त्रियांचे वर्तन, पेहराव, जबाबदाऱ्या या विभागलेल्या होत्या व हे सगळे नियम काटेकोरपणे पाळणं अपेक्षित होतं. पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ समजली जायची (अजूनही बहुतेक ठिकाणी हीच स्थिती कायम आहे.) लैंगिक विषयाबद्दल बोलणं, लिहिणं, माहिती पुरवणं भारतीय दंडसंहिता २९२ कलमाच्या खाली गुन्हा होता (आजही आहे). लैंगिक विषयावरच्या प्राचीन ग्रंथांचे भाषांतर करून विकणं सुद्धा दंडास पात्र ठरू शकत होतं. (१९३७ साली जेव्हा गजानन रघुनाथ मुळे यांनी 'अनंगरंग' (लेखक कल्याणमल्ल) चं मराठी भाषांतर छापलं तेव्हा त्यांच्यावर हे कलम लावण्यात आलं. ते त्यातून निर्दोष सुटले पण त्यासाठी त्यांना सांगावं लागलं की हे वाड्:मय फक्त विवाहित पुरुषांसाठी आहे व ते वाचून पुरुषांना आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहण्यास मदत होईल. [15]) या अशा अत्यंत सनातनी व संकुचित समान स्वास्थ विचारसरणीला छेद देण्याची मोठी कामगिरी र. धों. कर्वे यांनी केली. त्यांनी १९२०च्या दशकात मुंबईत कुटुंबनियोजनाची माहिती व साधनं लोकांना द्यायला सुरूवात केली. त्यांच्या 'समाजस्वास्थ्य' मासिकातून त्यांनी लैंगिकतेच्या विविध पैलूंवर संवाद सुरू केला. संतती नियमन, गुप्तरोग इत्यादी विषयावर पुस्तकं लिहिली. लैंगिक विषयाचं ज्ञान लोकांना मिळावं, समाजाच्या लैंगिक इच्छा, गरजांकडे बघण्याचा दृष्टिकोन निरोगी व्हावा यासाठी त्यांनी काबाडकष्ट केले. समलिंगी संभोगावरचा कायदा बदलावा असं 'समाजस्वास्थ्यच्या' अंकांत १९५३ साली लिहून आलं होतं. [16] अर्थातच त्यांच्या कामात त्यांना प्रखर विरोध झाला. त्यांचा सखोल अभ्यास, सडेतोड उत्तर देण्याची पद्धत, पुरोगामी विचारसरणी लोकांना झेपणारी नव्हती. त्यामुळे त्यांचं कार्य सदैव उपेक्षितच राहिलं. १९३० साली 'ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स'नी वाढती लोकसंख्या हा विषय हाती घेतला. त्यांनी मातेचं व नवजात बालकांचं मृत्यूचं प्रमाण हे महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले. गरीब लोकांनी कुटुंबनियोजन केलं नाही तर भारत देश अजूनच गरीब होईल या विचारातून १९५१साली कुटंबनियोजनाचं धोरण तयार करण्यात आलं. १९५०च्या दशकात आयपीपीएफ (इंडियन प्लॅन्ड पेरेंटहूड फेडरेशन) व एफपीओआय मो.रनाथ शिकार सम्पmeterm14.. म.heaternet इंद्रधनु ... २३