पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऐतिहासिक दृष्टिकोन , भारताच्या संस्कृतीचा हजारो वर्षांचा इतिहास आहे, पण हा इतिहास सलगपणे उपलब्ध नाही. धार्मिक ग्रंथ, नियमावली, लैंगिकतेबद्दलचं लिखाण, वैद्यकीय साहित्य, पुरातन शिल्प यांच्यातून आपल्याला वेगवेगळ्या काळातल्या संस्कृतीची झलक बघायला मिळते. प्राचीन भारतातले लैंगिकतेबद्दलचे उल्लेख वेगवेगळ्या ग्रंथांत आढळतात. लैंगिक इच्छापूर्तीशी निगडित अनेक उल्लेख आपल्याला काही वेदांमध्ये दिसतात (उदा. 'ऋग्वेद', 'अथर्ववेद'). 'मनुस्मृती', 'कौटिलीय अर्थशास्त्र' यांसारख्या नियम/ कायद्यांच्या ग्रंथांत लैंगिकतेबद्दल उल्लेख आहेत. कामरसावर लिखाण असलेले 'कामसूत्र', 'अंगरंग' सारखे ग्रंथ आहेत. वैद्यकीय ग्रंथांत आपल्याला लैंगिकतेचे काही पैलू दिसतात (उदा. 'सुश्रुतसंहिता', 'चरकसंहिता'). विविध लैंगिक इच्छा, रूपं दर्शवणाऱ्या अनेक पौराणिक कथा उपलब्ध आहेत (उदा. 'महाभारत', 'स्कंद पुराण'). काही पुरातन देवळांच्या शिल्पात विविध प्रकारचे लैंगिक संबंध दाखवले आहेत (उदा. 'खजुराहो', 'कोनार्क'). या सगळ्या साहित्यातले बहुतांशी उल्लेख भिन्नलिंगी संबंधांशी निगडित असले तरी काही ठिकाणी समलैंगिकतेची (व इतर लैंगिक पैलूंची) उदाहरणंही दिसतात. यातली काही उदाहरणं खाली दिली आहेत. नारद पुराण [1] जे महापापी अयोनीत (योनीपेक्षा भिन्नस्थानी), वियोनीत (विजातीय योनी, पशु योनीत) वीर्यत्याग करतात त्यांना यमलोकी वीर्याचेच भोजन मिळते. त्यानंतर चरबीने भरलेल्या विहिरीत ढकलून त्यांना वीर्याचे भोजन दिले जाते. कौटिल्याचे अर्थशास्त्र [2] ४.१२.२० स्त्रीकडून भ्रष्ट झालं कुमारिकेने, तिची संमती असल्यास व ती त्याच वर्णाची असल्यास बारा पण दंड दिला पाहिजे, भ्रष्ट करणाऱ्या स्त्रीने दुप्पट दंड दिला पाहिजे. ४.१२.२१ तिची संमती नसल्यास भ्रष्ट करणाऱ्या स्त्रीने आपल्या वासनापूर्तीप्रीत्यर्थ शंभर पण दंड व तिचे शुल्क दिले पाहिजे. ४.१२.२२ स्वत:ला आपल्या हाताने भ्रष्ट करून घेणाऱ्या कुमारिकेने राजाचे दास्य पत्करले पाहिजे. ४.१३.४० योनीशिवाय अन्यत्र स्त्रीशी समागम करणाऱ्यास, समागम करणाऱ्यास प्रथम साहसदंड करावा. तसेच पुरुषाशी इंद्रधनु ... १९