पान:इंदिरा.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ साकी. वाटे राजसुता की अपुला टाकुनि द्यावा वेष, कवळुनि ऐशी सती उराशीं, सांगावा उद्देश; परि मन थांब ह्मणे, । जाई कार्य न तडि तेणें. १६ श्लोक. बोले राजसुता "महागुणि तुझी, हो धन्य साच्या सती आलां या नगरींत, होउ तुमचा उत्कर्ष सारे रितीं, स्वीकारा पथ जो स्वयें निजहिता यत्नीं बहू काढिला, सेवा पंथ अह्मांस मान्य दिसतो, तो पाहिजे वाढला. १७ दिंड्या. "" काय तुमच्या गांवच्या स्त्रिया ऐशा उंच असती कीं ताड माड जैशा ? तदा शशिवदनें उत्तराशिं केलें- “राजमंदिरिंहुन हें त्रिकूट आलें." १८ " असां तुह्मी का राजधामिं नारी ? • नम्र वाणीनें इंदिरा विचारी; “तरी का हो जाणतां राजपुत्र ? " वदे, परिसा, शशिवदन प्राणमित्र - १९ "सकलसगुणसंपन्न मोदराशी शौर्यमूर्ती नरवीर जो तुझांशीं दिव्य हेतू हा हृदयिं वागवीतो, अन्य कोणा वरणार ना ह्मणे तो." २० श्लोक. परिसुनि नृपकन्या वाक्य हें, काय बोले- " न कधिं वचन ऐसें ग्रामिं या आयकीलें;