पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागत असे. त्यांची बाह्य जननेंद्रिय स्त्रियांची असतील तर ती स्त्री आहे असं मानलं जायचं. पुढे ही अपमानास्पद पद्धत बंद झाली.
 त्यानंतर तंत्रज्ञानाच्या आधारावर तोंडातील काही पेशी घासून काढल्या जायच्या व पेशींतील लिंग गुणसूत्रांची तपासणी (Sex Chromatin Test) केली जायची, पण या चाचणीचा निष्कर्ष चुकण्याचं प्रमाण जास्त होतं (म्हणजे 'फॉल्स पॉझिटिव्ह' येण्याचं प्रमाण जास्त होतं) म्हणून कालांतराने ही पद्धतसुद्धा बंद झाली.
 सध्या, जर एखाद्या स्त्री खेळाडूबद्दल तक्रार आली (कोणी त्या खेळाडूच्या लिंगाबद्दल शंका घेतली) तर त्या खेळाडूची जेन्डर टेस्ट' केली जाते. यात विविध तपासण्या केल्या जातात. जननेंद्रियांची तपासणी, लिंग गुणसूत्रांची तपासणी, रक्तातील संप्रेरकांची तपासणी, सोनोग्राफी इत्यादी. या तपासण्यात ती उत्तीर्ण झाली नाहीतर ती 'जेन्डर टेस्ट' अनुत्तीर्ण झाली असं मानलं जातं. (उदा., शांती सौंदराजन. तिची आत्मकथा या पुस्तकात दिली आहे.)
• हायपरअँड्रोजेनिझम
 आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये स्त्रीने भाग घेण्यासाठी तिचं 'टोटल सेरम टेस्टोस्टेरॉन' हे पुरुषांच्या रेंज'मध्ये नसलं पहिजे. Normal Male Range of Total Testosterone In Serum >=10 nmol/L. [8]
 जर स्त्रीचं 'टोटल सेरम टेस्टोस्टेरॉन' पुरुषांच्या रेंज'मध्ये असेल तर त्याला हायपरअँड्रोजेनिझम म्हणतात व स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी स्त्रीला दाखवून द्यावं लागतं, की हायपरअँड्रोजेनिझममुळे तिला खेळाच्या दृष्टिकोनातून काही फायदा होत नाही.
 काही जणांचं मत आहे, की स्त्रियांमधील टेस्टोस्टेरॉनच्या प्रमाणाचा हा निकष काही जणांवर अन्याय करणारा असू शकतो, कारण उच्च प्रणालीतल्या काही स्त्री खेळाडूंमधील अँड्रोजेन संप्रेरकांचं प्रमाण जास्त

असतं व ते पुरुषांच्या रंज'मध्ये असू शकतं.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ७७