पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३ गर्भधारणा व गर्भाचं लिंग


 गर्भाचं लिंग कसं ठरतं? गर्भाच्या जननेंद्रियांची घडण कशी होते? हे समजण्यासाठी गुणसूत्र व जीन्स यांच्याबद्दल प्राथमिक माहिती समजणं आवश्यक आहे.
गुणसूत्र व जीन्स
 मानवी शरीरात विविध प्रकारच्या पेशी आहेत. प्रत्येक पेशीचं विशिष्ट प्रकारे कार्य चालतं. कोणतं कार्य करायचं, काय करायचं, कसं करायचं याच्या सूचना प्रत्येक पेशीत असतात. या सूचना विशिष्ट रसायनांच्या रचनेच्या रूपाने तयार असतात. रसायनांच्या प्रत्येक रचनेला 'जीन' म्हणतात. अशा रसायनाच्या अनेक रचना (जीन्स) एकापुढे एक साखळीसारख्या घट्ट वेटोळ्यात जोडलेल्या असतात. या अशा एका साखळीला ‘गुणसूत्र' म्हणतात.

गुणसूत्र


जीन सेंट्रोमीअर ano जीन जीन ©U.S. National Library of Medicine

 प्रत्येक गुणसूत्राचे तीन भाग असतात. छोट्या भागाला p' म्हणतात, मोठ्या भागाला 'q' म्हणतात व मधल्या भागाला 'सेंट्रोमीअर' (Centromere) म्हणतात.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख २४