Jump to content

पान:इंग्लंडला पडलेला पेच.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ सांपत्तिक कारभारासंबंधाने करण्यास निदान सुरुवातीला तरी कोणी इंग्रज हवाच होता; व या बाबतींतलें श्रेय कराची चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष व मुंबई कायदे कौन्सिलाचे सभासद एम्. डी. पी. वेब, सी. आय ई., यांनीच प्रथम मिळविलें असें म्हटलें पाहिजे. कराचीचे एक व्यापारी या नात्यानें तें बंदर व शहर पुढे यावें, त्याची भरभराट व्हावी, म्हणून चळवळ करून त्यांनीं आपलें विचार- स्वातंत्र्य पूर्वीपासूनच प्रगट केलेलें होतें. परंतु हिंदुस्थानच्या सांपत्तिक स्थितीसंबं- धानें विशेषतः हिंदुस्थानांतील सोनेरुपें व चलनी नाणें यांसंबंधानें केवळ हिंदुस्थानच्या फायद्याच्या दृष्टीने त्यांनी अलीकडे विवेचन करण्यास सुरुवात केल्यापासून त्यांच्या मतस्वातंत्र्यास खन्या सहानुभूतीची जोड मिळून त्यांचे उद्गार हिंदी लोकांस विशेष हृदयंगम व प्रिय असे वाटूं लागले आहेत. पण वर सांगित- लेल्या कारणाकरितां खकीय व सजातीय मनुष्य बोलतो म्हणून इंग्रज लोकांच्या मनावरही त्या बोलण्याचा परिणाम होऊं लागला आहे. मि. वेब यांनी ' स्वदेशी चळवळ, ' — हिंदुस्थान व साम्राज्य ' या नांवाचीं पुस्तकें लिहिलेलीं असून त्यांत सांपत्तिक विषयासंबंधानें हिंदी लोकांचें जें म्हणणें आहे त्याचें त्यांनी समर्थनच केलें आहे. प्रस्तुतच्या पुस्तकांतही साधारणतः तोच विषय आहे. पण त्यांतल्या- त्यांत हिंदुस्थानच्या स्टेट सेक्रेटराच्या हातीं हिंदुस्थानच्या सर्व सरकारी पैशाच्या देवघेवीवर व अदलाबदलीवर अनियंत्रित सत्ता असल्यामुळे हिंदुस्थानचें नुकसान कसें होतें हें त्यांनीं स्पष्टपणे दाखविलें आहे. पुढे दिलेली नुसती विषयानुक्रमणिका वाचणारास देखील मि. वेब यांच्या प्रमेयाचा खुलासा व प्रमाणाचा तपशील सहज मिळण्यासारखा असल्यामुळे त्याचा सारांशही या प्रस्तावनेत देण्याचें कारण नाहीं. इतकेंच सांगितलें असतां पुरें होणार आहे कीं, मि. वेब हे इतर युरोपियन व्यापा- यांप्रमाणें हिंदुस्थानांत व्यापार करून पैसा मिळविण्याकरितां आलेले एक व्यापारी असतांही हिंदुस्थानचे राष्ट्रीय हित-निदान पैशाच्या दृष्टीनें तरी कशांत आहे हैं पाहण्याची आणि या बाबतींतले आपले विचार निर्भिडपणें बोलून दाखविण्याची पात्रता व धैर्य त्यांच्या अंगी आहे हे त्यांना अत्यंत भूषणास्पद होय. प्रस्तुत विषय मि. वेब यांनी निर्भिडपणे पुढे मांडल्यामुळेच हल्लीं विलायतेंत फायनॅन्स कमिशन बसून त्याची चर्चा सुरू झाली आहे असें म्हटलें पाहिजे. या चौकशीतून हितकर असें कांहीं निष्पन्न झालें तर त्याचें बरेंच श्रेय मि. वेब यांना द्यावें लागेल. सदर पुस्तकांतील विषयासंबंधानें फुटकळ चर्चा हिंदुस्थानांत वर्तमानपत्रांच्या द्वारें मधून मधून झाली आहे. व मि. वेब यांचें मुख्य प्रमेय काय असावें याविषयीं