Jump to content

पान:इंग्लंडला पडलेला पेच.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. हिंदुस्थानांतील लोकांना आपले हित कशांत आहे, व आपलें अहित कशापासून होईल-अर्थात् आपणांस काय हवें हें चांगलें समजत असतें. पण ज्यांच्या हातून तें मिळवावयाचें त्यांना आपले म्हणणे समजेल, पटेल व ठसेल अशा रीतीनें कसें मांडलें जाईल याचीच मुख्य अडचण असते. मनांतील विचार निश्चित व कल्पना- विशद असल्यामुळे आपला अभिप्राय व्यक्त करण्यास योग्य शब्द कसे सांप- डतील ही कांहीं अडचण नव्हे. पण निश्चित व विशद अशा शब्दांचाही ठसा मनावर उमटविण्यास ऐकणाराच्या मनांत बोलणारासंबंधीं अनुकूल ग्रह असावा लागतो. एरव्ही बोलणें सौम्य असलें तर तें मऊपणाचे लक्षण व कडक असलें तर फाजीलपणाचें लक्षण असें म्हणून कोणत्याना कोणत्या तरी रीतीनें तें फोल होण्याचा प्रसंग येतो. पण हिंदी लोकांनीं जें बोलावयाचें तेंच बोलणारा जर कोणी इंग्रज भेटला, तर एकदम सर्वच मनु पालटतो. इंग्रज बोलतो म्हणून त्याला महत्व आपोआप येतें. तो सौम्य शब्दांनी बोलला तर तो त्याचा विनय व भारदस्तपणा ठरतो व कडक बोलला तर ते केवळ त्याच्या निःस्पृही व प्रामाणिक अशा स्वभावाचें, अर्थात् इंग्रज लोक ज्या प्रकारचें शील आपलें आहे असें मानतात त्याचें, दर्शक मानलें जातें. राजकीय विषयांवर सर वुइल्यम वेडरबर्नपासून हाईडमनसाहेबांपर्यंत इंग्रज लोक जें जें लिहितात त्यांतील विचार हिंदी लोकांच्या लेखांत येत नसतील असें नाहीं. पण राज्यकर्त्यांच्या दृष्टीनें त्यांचा सजातीय इंग्रज जें बोलेल तें हिंदी लोकांच्या बोलण्यापेक्षां अधिक वजनदार व महत्वाचें ठरत असतें. म्हणून या लोकांच्या बोलण्याला सरकार जें महत्व देतें त्याच्या दसपट महत्व इकडील लोकांनी दिल्यास आश्चर्य नाहीं. हिंदी लोकांच्या राजकीय गाहाण्यासंबंधानें वेडरबर्न, ह्यूम, कॉटन वगैरे इंग्रज लोकांनीं चर्चा करून ज्या प्रकारची मदत केली त्या प्रकारची मदत हिंदुस्थानच्या