पान:आलेख.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





तैलोक्यांत विदुरासारखा, नित्यधर्मानुसारच वागणारा धर्माचे संपूर्ण रहस्य जाण-

णारा पदरी असूनही त्याचा लाभ घेता आला नाही. भीष्मसुद्धा वेळ प्रसंगी विदु

राला सल्ला विचारीत यावरून त्याची विवेकशक्ती दिसून येते. विदुराने दुर्योधन

जन्माच्या वेळी झालेल्या अपशकुनांचा विचार करून कुलघातक लक्षणी दुर्योधनाचा

त्याग करण्यास सांगितले होते.

  त्यजेत् एकं कुलस्वार्थे,

  ग्रामस्यायें कुलं त्यजेत् ।

  देशस्यायें त्यजेत् ग्रामं,

  आत्मार्थं पृथिवी त्यजेत् ॥

 जो धर्मपर राहून राजाला काय आवडेल अथवा काय आवडणार नाही

याचा मुळीच विचार न करता अप्रिय पण पथ्यकारक स्पष्टपणाने बोलतो त्यानेच

राजा खरा सहाय्यवान होतो" ही विदुराची महाभारतातील भूमिका होती, दुर्योधन

जन्मवेळची ही विदुराची जाणीव केवढी महत्वाची व दीर्घदर्शीपणाची होती यांची

साक्ष पुढे पटतेच 'हितं मनोहारिच दुर्लभं वचः ।' असे विदुराचे बोलणे होते. पांडव

धर्मनिष्ठ व न्यायप्रिय असल्यामुळे विदुराचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम होते.


 विदुर दासीपुत्र होता म्हणून त्याला 'भत्ता' म्हटले आहे. तो अत्यंत बुद्धि

मान नितिज्ञ धर्मज्ञ व प्रथमपासून श्रीकृष्णाचा एकनिष्ठ भक्त होता. धर्मशील

आणि पितृहीन पांडवांकडेच त्याचा सगळा ओढा होता. कारण यतो धर्मस्ततो

जय: । हे विदुराला ठाऊक होते. भीमाला विषप्रयोग, जतुगुहृदाह द्यूत पांडव

वनवास, महाप्रस्थान या प्रत्येक प्रसंगी विदुरच तारतो. विदुराचे जीवन स्वतःसाठी

नव्हतेच म्हणूनच शेवटी त्याची प्राणज्योतही धर्मराजातच विलीन पावते, महा-

पंडित विदुराची वाणी महाभारतात ऐसपैस पसरलेली आहे. दिलासा देण्याचे

प्रसन्नता निर्माण करण्याचे सामर्थ्य या वाणीत आहे. विशुद्ध चांगुलपणाचे तेज आहे.

त्याचे सारे जीवन इतरांना समर्पित आहे. तो स्वत:साठी जगतच नाही. त्याला

वैयक्तिक जीवन नाही, सान्या विदुर नीतिचे ध्येय सार्वकालीन शांतमय जीवन

आहे. मानवाचे मूळ माणूस आणि ध्येयही माणूसच हेच विदुराच्या जीवनाचे सार

आहे. प्रज्ञावान मुनीची पावले भूमीवर दिसत नाहीत. तरीही महान ज्ञानी, धर्मज्ञ,

नीती तत्ववेत्त्या विदुराची पवित्र वाणी महाभारातभर निनादत राहिली आहे.

विदुर महात्मा होता आणि म्हणूनच महात्म्यांच्या पदरी जे बांधले जाते तेच

विदुराच्याही वाट्याला आले. सत्ताविहीन शहाणपणाला व्यवहारवादाची लक्ष्मण

रेषा आखलेली असते. त्या रेषेतच या अलौकिक कर्तृत्वाचे महत्व भरून राहते.


आलेख            ८७