पान:आलेख.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




निवेदनम्



 'आलेख' हा माझा दुसरा समीक्षा लेख संग्रह. १९७७ साली 'अभिव्यक्ती प्रसिद्ध झाला आणि 'अ' गिरवता आले, आता. हा 'आ' गिरविण्याचा प्रयत्न आहे. 'अभिव्यक्ती'चे सर्वत्र स्वागत झाले. अनुकूल, प्रेरक अभिप्राय आले. प्रा. रा. ग. जाधव, डॉ, र. वि. हेरवाडकर डॉ. श्री. म. पिंगे, डॉ. म. बाः कुळकर्णी यांच्या सारख्या मान्यवरांनी दिलासा देणारी परीक्षणे लिहिली. त्याचा परिपाक म्हणूनच 'आलेख' सिद्ध झाला आहे.
 आलेख म्हणजे 'जे लिहिले ते'आ'-लेख' आलेख मधील लेखांना प्रथम प्रकाशात आणणाव्या औरंगाबादच्या प्रतिष्ठान, अस्मि- तादर्श, अजिंठा, नासिकच्या गावकरो, देवदूत, आपण, अभ्यासयोग, पुण्याच्या 'मनोरा', राजस' नांदेडच्या प्रतोद, पाऊलवाट या सर्व नियतकालिकांच्या संपादकांच्या आणि आकाशवाणीच्या जळगाव केन्द्राधिकान्यांचा मी ऋणी आहे. त्यांच्या सौजन्यानेच 'आलेख' मधील लेख संग्रहित झाले आहेत.

 'आलेख' मधील लेखाची मुद्रण प्रत करण्यासाठी श्री. शिरीष गनधे,मुकुंद येवलेकर,उदय शेवतेकर,गौतम भालेराव,सौ. वसुधा गिरधारो, कु. जयंती तांबुळवाडीकर यांनी लावलेला हातभार उल्ले- खनीय आहे. मुखपृष्ठाची कल्पनाही माझे विद्यार्थी मित्र श्री. शिरीष गंधे यांचीच आहे.
राधेय प्रकाशनचे श्री. रा. कृ. येरकुंटवार यांच्यासारखे उमद्या मनाचे मित्र मला प्रकाशक भेटले आणि आमची गाठ राधेय प्रका -