पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७)

 शैव - ( धार्मिक ) त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्र.

 वैष्णव-नृसिंहजयंती, महाएकादशी, अनंतचतुर्दशी, वैकुंठचतुर्दशी, दोलो- स्सव.

 कौटुंबिक — वटसावित्री, मंगलागौरी, पिठोरी अमावास्या, हरितालिका, ऋषिपंचमी.

 शाक्त – गौयुत्सव, ज्येष्ठागौरी, ललितापंचमी, सरस्वतीपूजन, देवी- नवरात्र, चंपाषष्ठी ( ? ).

 सौर - रथसप्तमी.

 गाणपत्य-गणेशचतुर्थी.

चैत्र महिना.

 चैत्र हा महिना इंग्रजी एप्रिल महिन्याच्या सुमारास येतो. हा महिना वसंतऋतूच्या प्रारंभी गणला असल्यामुळे कित्येक उत्सव त्या ऋतूम योग्य होतील असेच रूढ झाले. चैत्र शु. १ दा हा वर्षारंभाचा दिवस मानण्यांत येऊन, त्या दिवशीं ध्वजारोपण, निंबपत्राचें भक्षण, संवत्सरफलाचें श्रवण वगैरे विधि उरकला जातो. चैत्र मास अधिक मास असल्यास नूतन वर्षाचा आरंभ अधिक मासींच होतो. चैत्र शु. १ देपासून ९ मीपर्यंत देवी नवरात्राचा उत्सव करावा. या देवी नवरात्राचा पारणादिक विशेष निर्गय शारद नवरात्राप्रमाणें समजावा असे धर्मसिंधू * सांगितले आहे.

 चैत्रापासून चार महिनेपर्यंत प्राणिमात्रास पाणपोईच्याद्वारें जलदान करावें. याला प्रपादान असें ह्मणतात. चार महिने पाणपोई घालण्यास ज्याला शक्ति

नसेल त्यानें दररोज ब्राह्मणाच्या घरीं उदककुंभ यावा. चैत्र शु. प्रतिपदा ही


 * धर्मसिंधु या ग्रंथावर आमच्यांतील वैदिक वर्गाची सारी भिस्त आहे. त्यांत अनेक धर्मकृत्यांचा ऊहापोह असून शुभाशुभ कृत्यांचा निर्णय सांगितला आहे. धर्मसिंधु हा ग्रंथ अगदींच अलीकडे ह्मणजे इ. स. १७९० सालीं (शके १७१२) रत्नागिरी जिल्ह्यांत संगमेश्वर तालुक्यांत गोळवली नांवाच्या खेड्यांत राहणारे काशिनाथ अनंतोपाध्याय यांनी संस्कृत भाषेत लिहिला.