पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 थोडक्यात ही माझ्या अनुभवाची व विचारांची शिदोरी. याचबरोबर हे कटु सत्य ध्यानात आले की आधुनिक वैद्यक, आयुर्वेद, होमिओपाथी ही एकमेकांना पूरक आहेत एवढेच नव्हे आयुर्वेद व होमिओपाथी ही काही बाबतीत श्रेष्ठ आहेत. सबब मी थोडाफार होमिओपाथीचाही अभ्यास केला. यातून मला मिळणाऱ्या यशाचे प्रमाण वाढू लागले.ह्या पार्श्वभूमीवर ती. दादांनी जेव्हा मला ह्या त्यांच्या ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्यास सांगितले, तेव्हा मी त्यांना म्हटले, "दादा, माझ्यापेक्षा आधुनिक वैद्यकात अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ व उच्चशिक्षित लोक आहेत. आयुर्वेद व होमिओपाथी यांचे माझे ज्ञानही कोते आहे. मग तुम्ही अशा ज्येष्ठ व्यावसायिकांकडून प्रस्तावना का घेत नाही?" यावर त्यांनी दिलेले उत्तर फार चिंतनीय आहे. ते म्हणाले,
 "विजू, तू म्हणतेस ते फक्त अर्धसत्य आहे.मोठ्या डिग्रीज म्हणजे उपचार.पद्धतीतील एक छोटा भाग. एकूणच मानवाने बाह्यसृष्टी ओरबाडून तिचा उपभोगासाठी उपयोग करून घेतला व आजही घेत आहेत, त्यामुळेच आरोग्यही नष्ट होत चालले आहे. तसेच एक अंतर्विश्व आपल्यामध्ये आहे. चंगळवाद, सुख, त्यासाठी ओरबाडून घेण्याची वृत्ती आणि आत्मकेंद्रितपणामुळे कारुण्य, माणुसकी यांचा होत असलेला लय ही एकूण समाज व त्याचाच एक भाग म्हणून वैद्यकशास्त्राचा व्यवसाय करणारांचा नैतिक हास झपाट्याने होत आहे. रुग्ण म्हणजे आर्थिक लाभाचे साधन असे मानले जाऊ लागले आहे. या अंधारातही श्रेष्ठ माणूस असलेले वैद्यकश्रेष्ठी आहेत. त्यांचे पुढे मी नेहमीच नम्र होतो.
 "दुसरा भाग म्हणजे मी लिहिलेल्या ग्रंथांना प्रस्तावना घेण्याचा. हे वैद्यकश्रेष्ठी आपल्या पद्धतीच्या पलीकडे एक विशाल क्षेत्र आहे, हेच मान्य करत नाहीत.आज निदान इंटिग्रेटेड पद्धती मान्य झाली आहे. परंतु तिचा व्यवहारात फारच थोडा उपयोग केला जातो. या अहंभावामुळे माझ्या कार्याला या लोकांकडून मान्यता मिळणे कठीणच. अशा परिस्थितीत माझ्या ग्रंथांना काही मूल्य असेल तर प्रस्तावना कोणी लिहिली याला महत्त्व नाही. खूप श्रेष्ठ लोकांनी प्रस्तावना दिल्या तरी मूल्यहीन पुस्तके फार लवकर विस्मरणात जातात.'

 'वेध विकारमुक्तीचे' या पुस्तकाचे प्रत्येक प्रकरण चिंतनीय आहे. यात दा म्हणतात, “अध्यात्म म्हणजे कर्मकांड नव्हे. यात जीवनाच्या सर्वांगांचा विचार