पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चर्चा केलेली आहे.त्यासाठी सोपे सोपे मार्ग सुचवले आहेत. विपश्यना व रेकी यावरही चर्चा आहे.
 भारतीय तत्त्वज्ञानातील धर्माची सुंदर कल्पना यात सांगितली आहे. पुढे असेही म्हटलेले आहे की, धर्म हा सर्वांचा एकच आहे. ज्याला आपण धर्म समजतो ते फक्त पंथ आहेत. जेव्हा पंथ, जात, देश, काल ह्यापलीकडे जाऊन जीवनपद्धतीतील सर्वसमभाव, मानव्य, करुणा ह्यांना उच्च स्थान दिले जाते तेव्हा तो धर्म होतो.

 आपल्या समाजात दिवसेंदिवस वृद्धांची संख्या वाढत चालली आहे. दीर्घायुष्य व निरोगी जीवन, वृद्धांच्या समस्या, त्यावर उपाय, व शेवटी मृत्यू हा अटळ आहे व त्याला कसे सामोरे जावे हे दादा सांगतात. आहाराचीही प्रदीर्घ चर्चा आहे.

 ती. दादा गेली एकवीस वर्षे हे असे अपेक्षाविरहित कार्य करत आहेत. आतापर्यंत त्यांची चार-पाच पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. दादांचे हे कार्य ही माझीही प्रेरणा आहे. आमचे संबंध अनेक वर्षांच्या अनुभवातून, विचारांच्या देवघेवीतून, मायेच्या घट्ट दोराने बांधलेले आहेत. पितृतुल्य दादांनी दाखविलेला मार्ग अनुसरणीय आहे. दादांचे हे कार्य दीर्घकाळ चालत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.



डॉ. सौ. शोभना (विजू)लेले


बी ४० अल्ट्रा सोसायटी,


माहीम, मुंबई : ४०००१६.


फोन (निवास) : (९५२२) ४४६६१०२


(कार्यस्थल) : (९५२२) ४०७१४०६