पान:आरोग्यविज्ञान.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हाडें. मध्यम वयामध्यें आपल्या शरीरांत जवळ जवळ दोनशें हार्डे असतातः हातापायांचीं मुख्य मोठीं हाडें व बहुतेक सांधलेले लहान लहान तुकडे. लंबून असतो. कौतुक वाटेल. शरीरांतील सर्व ताठपणा हाडांवरच अव- हाडांचें सांधकाम पाहून कुशल कारागिरालाही प्रत्येक अवयवाच्या गतीप्रमाणें तेथील सांध- काम असतें. यंत्रें नीट चालावीं म्हणून तेल घालावें लागतें तशी आपोआप तेल मिळण्याची योजनाही ह्या सांध्यांजवळ केलेली असते. मेंदू, फुप्फुसें व रक्ताशय ह्या नाजूक भागांचें संरक्षण त्यांच्यावरील हाडें करितात. अगदी लहानपणी हाडें थोडीं लवचीक असतात व वयोमानाप्रमाणें कठीण होत जातात. पाठीचा कणा सर्व हाडांपेक्षां निराळ्या त-हेने बनविलेला आहे. कणा हें एक हाड नसून ती एक लहान लहान हाडांची सांखळी आहे. शरीर वाटेल तसें वांकवितां यावें म्हणून एका हाडाऐवजी ही सांखळीची योजना आहे. तिच्या दुव्यांना आपण मणके ह्मणतों. ते सर्व पोकळ आहेत. कणा मानेंतून थेट डोक्याच्या कवचीपर्यंत जाऊन भिडलेला आहे व मेंदूचा एक भाग दोरीसारखा निमुळता होऊन कण्याच्या सर्व दुव्यांतून ओंवला गेला आहे. म्हणून शरीरांत मेंदूच्या खालोखाल ह्या भागाची योग्यता आहे. दांत हाडांसारखेच टप्पक असून, ते दिसतात त्याच्या जवळ जवळ दुप्पट लांबीइतके हिर- ड्यांत रुतलेले असतात, व ह्यावरच त्यांची मजबुती अवलंबून असते.