________________
७४ विष खाणे. कोणी विष खाल्लें असें समजल्याबरोबर डॉक्टरला बोलावणें पाठवावें. त्या माणसाच्या घशांत पीस अगर बोट घालून किंवा त्याला मिठाचें पाणी प्यावयास देऊन तो ओकेलसें करावें. ॲसिड प्याल्याचा संशय असल्यास मात्र हा उपाय करितां कामा नये. कोणतें विष खाल्लें हें कळल्यास त्याच्या उताराचाही उपाय सुरू करावा. अॅसिड खाल्लें असल्यास दुधांतून अगर पाण्यांतून खडू किंवा वॉशिंगसोडा द्यावा. अल्कली खाल्लें असल्यास लिंबाचा रस द्यावा. विषारी वायु हुंगला असल्यास स्वच्छ हवेंत नेऊन वाफ हुंगूं द्यावी. अफू खाल्ली असल्यास आंगावर खूप पाणी शिंपडून इकडे तिकडे चालवावें, निजूं देऊं नये, व हातपायांना मोहरीचें पोल्टिस लावावें. दारू खूप प्याला असल्यास ओकावयास लावणें हाच उपाय. शेवाळीसारखें कांहीं खाल्ले असल्यास ओकावयास लावून एरंडेल तेल पोटांत द्यावें. आर्सेनिक खाल्लें असल्यास तूप पिण्यास द्यावें. बेशुद्ध होणें... ह्याचे पुष्कळ प्रकार आहेत. प्रत्येकाप्रमाणें त्याचा उपाय झाला पाहिजे. (१) छातीवर टोला बसून अगर रक्तस्राव फार झाल्यानें ज्ञान- तंतूंना व नंतर सर्व शरीराला एकदम धक्का बसतो व मनुष्य बेशुद्ध होतो, तोंड फिके पडतें, श्वास मंद होतो, नाडीही