Jump to content

पान:आरोग्यविज्ञान.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३ निजवून रग, ब्लॅकेटसारखा लोकरीचा जाड कपडा आंगावर टाकून त्यांत त्याला गुंडाळावें आणि थंड पाण्यानें चबचबीत भिजवून टाकावा. आग विझविण्याकरितां पाण्यापेक्षांहि मातीचा अगर वाळूचा उपयोग करणें चांगलें. कपड्याने पेट घेतला असतां इकडे तिकडे धांवतां कामा नये, तसें करण्यानें आग जास्तीच भडकते. भाजलेल्या माणसाच्या अंगावरचा कपडा काढावयाचा असल्यास तो कधीं ओढून काढू नये, शिवणी कापून काढावा. एखादा भाग चिकटून बसल्यास भोंवतींचा भाग कापून काढून बाकी तसाच राहू द्यावा. भाजलेल्या माणसाच्या आंगांतील ऊब कायम राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेष ध्यानांत ठेवावयाची गोष्ट ही कीं, भाजून सोललेल्या भागाला हवा बिलकूल लागूं देतां कामा नये. असें व्हावयास भाजलेल्या भागावर पिसासारख्या मऊ पदार्थानें तेल अगर लोणी चोपडून लावावें. अळशीचें तेल व चुन्याची निवळी- सारख्या प्रमाणांत मिसळून लावली तर उत्तम. ह्याच्यावर मलमली- सारखा फडका त्याच तेलांत भिजवून लावावा व त्याच्यावर कापूस चिकटवून द्यावा. हें तेल न मिळेल तर भाजल्या जागेवर खडूची पूड, आरारूट अगर पीठ बरेंचसें पसरलें तरी चालेल. रासायनिक द्रव्यानें आंग भाजले असेल तर तो भाग आधी थंड पाण्यानें चांगला धुवून काढावा. अॅसिड पडून भाजलें असेल तर चुन्याची निवळी वर ओतावी. नंतर एरव्हींप्रमाणें उपाय करावे.