पान:आरोग्यविज्ञान.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

8 वगैरे गोष्टींकडे जर आपण अवश्य तें लक्ष्य दिलें तर शरीर निरोगी व जोमदार राहून आपल्याला सुख होईल. ही गोष्ट श्रीमंत अगर गरीब सर्वांना शक्य आहे. ह्यासंबंधींचे नियम थोडक्यांत समजावून देण्याचा प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश आहे. पुस्तक १९११ सालीं लिहिलें, व शाळाखात्याच्या बुककमिटीकडून पसंत ठरून आल्यावर १९१३ सालीं प्रसिद्ध केलें. कमिटींतील अनेक सद्गृहस्थांनीं केलेल्या सूचनांबद्दल मी सर्वोचा फार आभारी आहें. रा. म. जोशी.