पान:आरोग्यविज्ञान.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् - कालिदास. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारी पुरुषार्थ शरीराच्या सुस्थितीवर प्रथमतः अवलंबून आहेत. हें शरीररूपी यंत्र बनविण्यांत विधात्याचें अद्भुत कौशल्य नजरेस येते. हे यंत्र "ऑटोमॅटिकू" आहे, ह्मणजे हें आपली दुरुस्ती आपणच करितें, आपल्या चाकांना आपणच तेल देते, फार काय पण आपल्या भागांची वाढ देखील आपणच करितें. 'शतायुर्वै पुरुषः' ह्या वच- नावरून हैं शरीर शंभर वर्षेपर्यंत आपले काम करण्यास समर्थ राहिलें पाहिजें असें दिसतें. अर्थात् असें होत नसेल तर हे यंत्र वापरणारे जे आपण त्या आपल्यांतच कांहीं तरी दोष असला पाहिजे. मुलाच्या हातांत घड्याळ दिलें व यंत्रे पाहण्याकरितां त्यानें तें उघडून उघडून यंत्र विघ- डवून टाकिलीं तर त्याचा दोष यंत्रांकडे काय ? हैं शरीरयंत्र वापरतांना आपल्यांतील बरेच लोक लहान मुलाइतकेच अज्ञानानें अगर अविचारानें वागतात असें कष्टानें ह्मणावें लागतें. एका तज्ज्ञ लेखकानें ह्यटलें आहे, “हिंदुस्थानच्या मृत्युसंख्येपैकी शेकडा अठ्याहत्तर लोकांना ज्या रोगांनीं मरण येतें ते बहुधा अगर मुळींच होणार नाहींत असें करणें शक्य आहे". आपल्या शरीराचे व्यापार कसे चालतात तें समजून घेऊन खार्णेपिणें, व्यायाम, आंघोळ, कपडालत्ता, राहण्याची जागा, संसर्गाविषयीं सावधगिरी