पान:आरोग्यविज्ञान.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७ शरीरांतील सर्व नलिका टोंकांस टोंक याप्रमाणें जोडल्या तर, त्यांची लांबी सुमारें अठ्ठावीस मैल होईल ! तेव्हां हें प्रचंड गटार स्वच्छ आहे कीं बुजून जाऊं पहात आहे, तें आपलें काम बरोबर करीत आहे कीं नाहीं, हें पाहणें किती अवश्य आहे बरें ! त्वचा हें स्पर्शेन्द्रिय आहे. ज्ञानतंतूंच्या साहाय्यानें त्वचेकडील सर्व खबर मेंदूला कळते. त्वचा हें शरीराचें पांघरूण आहे. ऋतुमानाप्रमाणें रक्तवाहि- न्यांतील रक्तप्रसार कमीजास्त करून शरीरांत अवश्य तेवढी उष्णता ठेवण्याचें काम त्वचा करीत असते. उन्हाळ्यांत रक्ताभि- सरण जोरानें चालवून त्वचा शरीरांतील बरीच उष्णता बाहेर जाऊं देते व शरीराला गारवा आणते; व थंडीच्या दिवसांत रक्तप्रसाराला अडथळा करून शक्य तितकी कमी उष्णता बाहेर जाऊं देऊन आंगांतील ऊब वाढविते. 16030300 आंतडें व पचनक्रिया. आपण शरीराची कोणतीही हालचाल केली, नुसते बोललों, इतकेंच काय पण केवळ विचार करीत बसलो तरी देखील, ह्या प्रत्येक कार्याकरितां मेंदूचा अगर स्नायूंचा कांहीं भाग खर्ची पडतो अथवा दूषित होतो, व तो दोष काढून न टाकला तर उपद्रव- कारक होतो. दूषित भाग काढून टाकण्याचें काम फुप्फुसें, त्वचा व मूत्राशय करितात, व झिजलेला भाग भरून काढण्याकरितां नवीन सकस रक्त तयार व्हावें लागतें. हें नवीन रक्त बनविण्याचें काम तोंड, पोट व आंतडें मिळून करितात. आपण जें अन्न खातों व पाणी पितों त्याचें रूपांतर होऊन रक्त होतें. ह्या कामी खाल्लेल्या सर्व अन्नाचा उपयोग व्हावा अशी इच्छा असेल तर