पान:आरोग्यविज्ञान.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ हा भाता सतत आकुंचन व प्रसरण पावत असतो व त्यावरच आपल्या शरीराचे सर्व व्यापार अवलंबून असतात. प्रत्येक आकुंच- नाबरोबर दोन क्रिया घडतातः (१) रक्ताशयाच्या एका कप्यांतून शुद्ध रक्त शरीरभर फिरण्याकरितां बाहेर पडणें, (२) दुसऱ्या कप्यांतून अशुद्ध रक्त शुद्ध होण्याकरितां फुप्फुसांकडे जाणें. प्रत्येक प्रसरणाबरोबरही दोन क्रिया घडतातः ( १ ) एका कप्यांत फुप्फुसांकडून शुद्ध झालेलें रक्त परत येणें, (२) दुसन्या कप्यांत शरीरभर फिरून अशुद्ध झालेलें रक्त परत येणें. हाच क्रम सतत चालू असतो. त्वचा. फुप्फुसांप्रमाणें त्वचा व मूत्राशय हेहि रक्तांतील दूषित भाग काढून टाकण्यास मदत करितात. त्वचेला अत्यंत बारीक रन्ध्रे असतात. एक चौरस इंच जागेत हीं जवळ जवळ दोन हजार असतात. हीं रन्ध्रे घाम बाहेर घालविण्याकरितां केलेल्या अतिसूक्ष्म नलिकांचीं तोंडें होत. (C) ( आकृति पहा.) ह्या नलिकांचीं दु- सरीं शेवटें रक्तवाहिन्यांजवळून जातात व त्यांतील दूषित पाणी शोषून घेतात. ह्या नलिका जरी लहान आहेत तरी, अति मोठा करून दाखविलेला त्वचेचा एक भाग.