________________
· दुसऱ्या आवृत्तीचा आनंद !! आरसा : आदिवासी जीवन शैलीचा ! पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा योग . लगेच येत आहे, यापेक्षा लेखकाचे दुसरे महाभाग्य ते कोणते ? प्रस्तुत आदिवासी .. विषयाचे अभ्यासक,जाणकार आणि पुरोगामी वाचकांनीच प्रतिसाद देऊन दुसऱ्या आवृत्तीने माझा आनंद द्विगुणित केला त्यांचेही आभार कोणत्या शब्दात मानावे? खरे तर पूजा कॉम्प्युटर्सने हा वैचारिक लेखसंग्रह प्रकाशित करण्याचे धाडस - केले याचेच मला नवल वाटले होते. अर्थात भीत भीतच त्यांनी मोजक्या प्रती काढल्या आणि त्याही हातोहात संपल्या. .. आता ही जबाबदारी युगांतर प्रकाशनाच्या सौ. रजनीताई डोळस यांनी स्वीकारली ही खरीतर आनंदाची गोष्ट आहे. युगांतर संस्थेने या पुस्तकाचा, नव्हे तर आदिवासींचाच फार मोठा गौरव केला आहे. युगांतर प्रकाशनाचे आभार मानण्यासाठी माझे शब्दभांडार अपुरे आहे. म्हणून युगांतर च्या ऋणात राहून . • त्यांच्या या अकृत्रिम स्नेहाला जपणेच मला महत्त्वाचे वाटते. C . . आदिवासी कला साहित्य संस्कृतीची जोपासना व्हावी आणि त्यांच्या नितळ जीवनशैलीचा सर्वांगीण विकास घडून यावा हा सद्भाव मनात बाळगणाऱ्या जाणकार वाचकांकडून या दुसऱ्याही आवृत्तीचे यथोचित स्वागत होईल याची खात्री आहे. माझ्या प्रमाणेच सर्वांच्या जीवनाला आत्मविश्वास आणि निर्भयता प्राप्त करवून देणाऱ्या आदिवासी बंधू भगिनींना हा ग्रंथ मी अर्पण करतो. नाशिक, मार्च २००४ प्रिं. डॉ. भा. व्यं. गिरिधारी विभा, पर्णश्री सोसायटी, एच. पी. टी. कॉलेजजवळ, नाशिक - ४२२००५