Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. प्रकाशकांचे मनोगत . दुसऱ्या आवृत्तीचे निमित्त . ... .. प्रिंसिपॉल डॉ. भा. व्यं. गिरिधारी यांचे “आरसा : आदिवासी जीवनशैलीचा" हे पुस्तक अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याने त्याची पहिली आवृत्ती फारच लवकर संपली. यावर विश्वास बसत नाही. अभ्यासपूर्ण लिखाणाबद्दल प्रि. डॉ. गिरिधारींचे अभिनंदन-कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यामुळे दुसऱ्या आवृत्तीबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी आनंदाने होकार दिला. पुस्तकामधील लिखाणामध्ये काहीच करायचे नसल्याने आमचे कामही सोपे झाले. . त्यांतच प्रिंटोरिअम, नाशिकचे श्री. विक्रम पळशीकर व श्री. भानुदास देव यांनी आवश्यक असलेले सहकार्य त्वरीत देऊ केले. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार . मानतो. . __ आमच्या दृष्टीने सर्व समाजामध्ये समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाची भावना निर्माण .. होणे ही भारतीयांसाठी काळाची गरज आहे. जागतिकीकरण, खासगीकरण ..... याच्या चक्रामध्ये सर्वसामान्य माणसाला खंबीर मनाने उभे राहायचे आहे. आदिवासी बांधवांना त्यासाठी योग्य मार्गदर्शन होण्याची गरज आहे. डॉ. गिरिधारी यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे त्याबरोबर शासनाला पथदर्शक दिशाही दिलेली. आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती. श्री शाहू महाराज, महात्मा : गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी पुरोगामी विचारवंतांना हवा असलेला सुदृढ भारत निर्माण करणे शक्य होणार आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने यापुस्तकाचा अभ्यास करून आपल्या देशबांधवांच्या प्रगतीसाठी झटले पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. सौ. रजनी डोळस प्रकाशक युगांतर प्रकाशन, पंजाब कॉलनी, नाशिकरोड दूरध्वनी : (०२५३) २४६१९५१ मार्च २००४ . . .