पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जमिन आणि शेती, कर्जबाजारीपणा, वन, संपर्क संज्ञापण समनुयोग, औद्योगिकरण, लोकशाही विकेंद्रीकरण, ग्रामीण उद्योग, शिक्षण, सहकार, घर बांधणी

क • आदिवासी विकास प्रशासन

 उद्दिष्टे : ऐतिहासिक दृष्टिकोनातून विकासाच्या योजनांच्या प्रशासकीय बाबींचा व त्यासाठी राबविल्या जाणाऱ्या यंत्रणेचा विद्यार्थ्यांना जवळून परिचय करून देणे, ब्रिटीश काळातील आणि स्वातंत्र्योत्तर काळातील विशेषतः पंचवार्षिक योजनांच्याकाळातील समीक्षणात्मक अभ्यास.

१. राज्य आणि केंद्र पातळीवरील प्रशासकीय संघटना
२. आदिवासी कल्याण आणि विकासाच्या प्रशासनाचे ऐतिहासिक पूनर्मूल्यांकन
३. आदिवासी उपाय योजना आणि प्रशासकीय कार्यपध्दती.
४. आदिवासी विकास मंडळ
५. आदिवासी प्रशासन राज्य आणि जिल्हा परिषद पातळी प्रशासन
६. समाजसेवी मंडळाचे आदिवासी विकासातील कार्य
प्रशिक्षण संशोधन आणि मूल्यमापन

ड. प्रात्यक्षिक अभ्यास :

विद्यार्थ्यांकडून पंचयात समिती विकासातील आदिवासी विकासाच्या समस्या आणि कार्यपध्दती याचा अभ्यास ज्यामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांचा समावेश होतो. लोकांनी सांगितलेल्या समस्यांचा अभ्यास आणि त्या समस्यांचा विकास विषयक प्रशासन देत असलेले तोंड यांचा अभ्यास.

इ. प्रबंधिका / निबंध : यामध्ये प्रत्यक्ष विशिष्ट आदिवासी विभागाचा समावेश असेल याचा अभ्यास व विश्लेषण अभिप्रेत आहे. एखाद्या विशिष्ट आदिवासी समूहाचा जाती उपजातीचा विविध विभागातील अभ्यास शक्य आहे. परंतू तो प्रत्यक्ष करता

येणे सुचविणे योग्य नाही. (संकल्पित पदविका अभ्यासक्रम आराखडा)

१५८