Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाब वाटू लागते.

आदिवासी भागातील शैक्षणिक समस्या :

 केवळ भौगोलिक नाही तर सांस्कृतिक अंतरही आदिवासींच्या जीवनात निर्माण झालेले आहे. नदीच्या प्रवाहातील स्वतंत्र बेटाप्रमाणेचं आदिवासी विद्यार्थी जीवन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून अलग राहून जाते.

 सुधारलेल्या सुशिक्षित महानगरापासून शेकडो मैल दूर दुर्गम डोंगराळ भागात ते राहतात. जाति विशिष्ट बोली वापरणारा एक छोटा समूह या मुलांचा होऊन बसतो. ठाणे जिल्ह्यात महादेव कोळी, वारली, कोकणा, ढोरकोळी, मल्हार कोळी, ठाकूरक, म, आणि कातकरी अशा आठ जाती आढळतात. यातील कोकणा आणि महादेव कोळी समाज सुधारलेला आहे. शिक्षित आहे. त्यांना वजा केले तर, नागरी जीवनापासून दूर राहिलेली या आदिवासींची बोली; प्रमाण मराठीतील ज्ञान ग्रहण करण्यासाठी कमी पडते. त्यांची गावठी बोली हेही त्यांच्या शैक्षणिक वातावरणातील दुराव्याचे एक कारण होऊ शकते. त्यामुळे शिकू पाहणाच्या आदिवासींच्या जीवनातही आर्थिक सामाजिक आणि मानसिक व सांस्कृतिक कुचंबनाच आढळते.

 शालेय साहित्य वेळच्या वेळी उपलब्ध होत नाही. महत्त्वाच्या विज्ञान, इंग्रजी, गणित विषयाला शिक्षक उपलब्ध होत नाही. शिक्षणाची गोडी लावून शिकविणारे.. भेटत नाहीत, होमवर्क करण्यासाठी होमच नाही. झोपडीत दिवाही नाही. त्यामुळे शिक्षणाचा प्रकाश पसरत नाही. आदिवासींची अल्पसंतोषी वृत्तीच त्याला कारणीभूत आहे.

 आदिवासींचे नित्याचे जीवन आणि त्यांना घ्यावयाचे शिक्षण यांच्यात कोठेही सुसंवाद आढळत नाही. त्यामुळेच आदिवासी शिक्षणाचा कंटाळा करतो. शहरी विद्यार्थी आणि ग्रामीण विद्यार्थी एकाच मापाने मोजले जातात. समान शैक्षणिक बातावरण नसतांना समान मोजमाप हा एक प्रकारे आदिवासी विद्यार्थ्याच्या बाबतीत घडणारा उघड अन्याय आहे. ते असमान परिस्थितीत असतात. सुविधा

१३९