पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वामी विवेकानंद, बिसान्टबाई इत्यादींनी मोठ्या कडाक्यानें केलाच आहे. पुढल्या शतकांत त्या रणसंग्रामाचा दुंदुभी युरोप- खंडभर दुमदुमून राहील. कारण, प्राच्यांच्या व पाश्चात्यांच्या विचार- सरणीत मोठा विरोध आहे; व तोडजोड होऊन मेळ पडण्याची शक्यताच नाहीं. आमच्या मतें ज्ञान मोक्ष मिळविणारें, त्यांच्या मतें ज्ञान भ्रष्ट करणारें, निदान ज्ञान मिळविण्याच्या यत्नामुळे माणूस भ्रष्ट झाला, ज्ञानद्वारा ईश्वराला मिळवावें हें त्यांना कबूल नाहीं. आह्मी दुसरें काम नसल्यास ईश्वराचें नांव घेत बसतों; त्यांच्या मतें ईश्वराचें व्यर्थ नांव घेऊं नये. आमच्या मतें हा संसार झूट आहे, व मोक्ष सर्वथा साधनीय होय; त्यांच्या मतें हें जग खरें आहे, व ह्यांतच खटाटोप करून नांव मिळवून घ्यावें. आमच्या मतें प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा; त्यांच्या मतें स्वतःच्या धर्माशिवाय इतर सर्व धर्म हाणून पाडावे. अशा रीतीनें बारीक दृष्टीनें विचार केल्यास बऱ्याच गोष्टींत त्यांचा आमचा विरोध सांपडेल.

 आतां गीतेंत किंवा आमच्या इतर धर्मपुस्तकांत कर्माशिवाय सुटका नाहीं, कर्म करावें असें सांगितलें आहे. पण साधारणपणें ह्या तत्वांचा परिणाम जनतेवर उलट झाला आहे, व मनुष्याचें लक्ष प्रवृत्तीकडून माघार घेऊन निवृत्तीकडे वळलें आहे. त्यामुळे पायांच्या हृदयांत अहंबुद्धि ज्याप्रमाणानें वागते त्या प्रमाणानें आमच्या आर्याच्या हृदयांत वागत नाहीं. अतएव आह्मी बुद्धीनें सम असूनही बऱ्याच वेळीं आमच्या हातून सारख्या धोक्याचीं कामें होत नाहींत. आह्मी भक्तीकडे जास्त वळू, किंवा मृत्यूस मोठ्या शौर्यानें तोंड देऊ, पण व्यावहारिक बाबतींत आमचा पाश्चात्यांबरोबर टिकाव लागत नाहीं त्यामुळें सध्यांच्या युरोपीय लोकांच्या मतांस तोंड देण्याचें त्राण आमच्यांत