पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९


कबूल करूं नका असें पुष्कळांस वाटतें. गोष्ट संपूर्ण ऐकून घेतल्यामुळे प्रतिपक्षाचें भांडण्याचें अवसान नाहींसें होतें.
 विशेष सांगण्याचें एवढेच कीं डोक्यांतून जाऊं नका, व गेलात तर जीभ आवरून धरा; पण राग आला असें लोकांस दाखवूं नका. " राग सोडून द्या व डोकें ठिकाणावर ठेवा. आ- पल्या हातून वाईट गोष्ट होईल इतका संताप करून घेऊं नका." कारण, “ नम्र भाषणानें रागाचें शमन होतें, पण टोंचणाऱ्या शब्दांनीं राग प्रज्वलित होतो. "
 जेथें तुम्ही नकोसे असाल, तेथें आगंतुकाप्रमाणें जाऊं नका; इतर पुष्कळ ठिकाणे आहेत. जेम्स राजा माशीला उद्देशून म- णतो - " माझीं तीन राज्यें नाहींत का ? तर तूं माझ्या डोळ्यां- तच उडावें !" कांहीं लोकांना भलत्याच गोष्टी बोलण्याची, किंवा ज्याच्या योगानें मनांत दुःखकारक गोष्टींचें स्मरण जागृत होतें, अथवा मतभेद उद्भवतो अशा गोष्टी बोलण्याची खोड असते.

 माणसाची ओळख पटणें ह्या ज्ञानापेक्षां जास्त उपयोगाची अशी शास्त्राची कोणतीही शाखा नाहीं. कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर ठेवू नये, तसेंच कोणत्या माणसावर किती ठेवावा, व कोणत्या गोष्टींबद्दल ठेवावा ह्याचा शहाणपणानें निश्चय करितां येणें फार महत्वाचें आहे; व हा निकाल लावणें सोपें काम नाहीं. आपल्याबरोबर जे काम करणार, व आपल्या हाताखालीं जे काम करणार त्यांची चांगल्या रीतीनें निवड करणें महत्वाचें आहे. ह्मणजे योग्य स्थळीं योग्य माणसाची नेमणूक करणें. “ एकाद्या माणसाबद्दल संशय असला तर त्याची योजना करूं नका; व योजना केली तर त्यावर संशय घेऊं नको."


 १ स्तोत्रें , २ कॉन्फ्यूशस.