पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१

वाढे, तसतसा आंगरखा त्याच्या शरीराभोंवतीं जास्तच गुरफटे. नंतर सूर्य आपल्या प्रखर किरणांनीं प्रकाशूं लागला. त्याबरोबर त्या गृहस्थाला उष्मा होऊं लागला. त्या उम्म्यानें काहली होऊन त्यानें आपला आंगरखा काढून टाकिला; इतकेंच नव्हे, तर बंडी देखील फेंकून दिली. हें पाहून सूर्य जिंकला असें वायूनें कबूल केलें. "

 समजूत पडल्यामुळे माणूस जितकें निमुटपणें काम करितो, तितकें त्याच्यावर अधिकार चालवून तो करीत नाहीं हें नेहमी लक्षांत ठेवावें. केव्हांही अधिकार चालविण्यापेक्षां उपदेशाच्या चार गोष्टी सांगणें बरें.

 " इष्ट काम गोड शब्दांनी करून घ्यावें; तें सिद्धीस नेण्यास तरवारीचा उपयोग होता होईल तों करूं नये. " राज्यकारभार करतेवेळी देखील अधिकाराचें जूं जितकें कमी जाचेल तितकें चांगलें, हा नियम पाळण्याजोगा आहे. ज्यांच्याशी तुमचा सहवास त्यांचा विश्वास तुमच्यावर बसेल, व त्या विश्वासाला तुझी लायक असाल, अशी खबरदारी ठेवा. नुसत्या हुशारीपेक्षां सद्वर्त नवरून विशेषतः पुष्कळ माणसांचें लोकांत वजन पडतें. फ्रान्सीस हार्नरला राजाच्या पदरीं मानाचा हुद्दा वगैरे कांहीं नव्हता. तरी राष्ट्रांच्या मसलतींत त्याच्या खुद्द मताचें फार वजन होतें. ह्मणून सिडनी स्मिथ त्याच्याविषयीं ह्मणे कीं, ईश्वराच्या दहा आज्ञा जणूं त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या होत्या.

 योग्य रीतीनें व न्यायास अनुसरून लोकांच्या मर्जीप्रमाणें वर्तन ठेवण्याचा यत्न करा. पण "अमुक गोष्ट आह्मांस आवडत नाहीं" असें ह्मणण्यास घाबरूं नका.

 होस हो देण्याचें काम कोणालाही करितां येतें. तरी मनांत


 १. शेक्सपीयर.