पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकमेकींना आधार देत,
पुढे जायचंय.
याला शिक्षणाची, अनुभवाची जोड द्यायची आहे.
ही सारी समजूत
या पिढीन शिकून घेऊन, जाणून घेऊन,
पोरींना, सुनांना आणि लेकांना सुद्धा याचा वसा द्यायचाय.

आताआदर्श म्हणून 'कुणाकडे बघू'? 'कोणासारखी होऊ?.
असं कुणाला तरी शोधत न बसता,
स्वत: पासून सुरू केलेलं घडणीचं काम
पुरं करायच्या मागं लागायचंय.

आधीच खूप उशीर झालाय,
चला तर कामाला लागू...
लक्षात ठेऊया
अजून बराच दूरवरचा पल्ला गाठायचाय
त्यातलं हे तर केवळ पहिलं पाऊल!


तुम्ही बी घडाना ॥               ७१