पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साऱ्यांनाच शिकायचंय.
यातून गावोगावच्या नेतृत्वावरही प्रभाव पडणार आहे.
आत्ताशी कुठं अधिकाराची ओळख झाली,
तो अधिकार,
कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही आमिषाला न भुलता,
समर्थपणे विधायक परिणाम घडण्यासाठी
वापरायला शिकायचंय.
आणि असं करायलही शिकवायचंय.

गावाला वळण लावायचं,
शाळा, बालवाडी जिवंत करायची,
आरोग्यकेंद्र धीर देणारं, खात्रीचं करायचंय.
पंचायतीत सर्व बाजू मांडून,
चर्चा करुन, निर्णय घ्यायला,
घेतलेले निर्णय वाढवायला, शिकायचंय,
काम करायला आणि करवून घ्यायला शिकायचंय,
आणि सारं करायचं ते, गावातल्या, आणि गावकुसा बाहेरच्या,
वाडी-वस्तीवरच्या, सर्वांना बरोबर घेऊन.

तरीही गावातलं गावपण जपायचं आहे.
हे करताना कुठं खटकलं
तर आपुलकीनं सांधून घ्यायचय.
कडू विसरुन,
साऱ्यांनीच आनंदानं, समाधानानं जगायला शिकायचंय.
आपापसातले सारे भेद विसरुन,
एकमेकींमधलं विश्वासाचं नातं बळकट करत,




७०               आम्ही बी घडलो।