पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देतात. महिलांमधे त्या दोघींच्या शब्दाला किंमतही आहे, आणि सगळ्यांचा विश्वासही आहे. त्यामुळे गटातल्या महिलांच्या अडचणी त्या सोडवतात.
 गटात नुसते पैशाच्या देवाण - घेवाणीचे व्यवहार झाले, तर गटाची ताकद पुरेशी वापरली जाणार नाही, हे उजाताईंनी बरोबर ओळखल. बचतगट म्हणजे पैशाची देवाण-घेवाण , एकमेकींना आधार हे आणि त्याहीपलीकडे - गावाच्या विकासात महत्त्वाचा वाटा उचलणारी ताकद, दबाव-गट, हे उजाताईंनी ओळखलं ,आणि त्याचा सगळ्यांच्याच भल्यासाठी उपयोग केला, म्हणून वरव्यातल्या गटांची इतकी प्रगती झाली. .गावालाही महिलांची ताकद पहिल्यांदाच कळली.
 गटात नुसते पैशाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार झाले, तर गटाची ताकद पुरेशी वापरली जाणार नाही, हे उज्ज्वलाताईंनी ओळखलं आणि नियम केला की गटातल्या प्रत्येक बाईला कमीत-कमी आपली सही करता आली पाहिजे,आणि हळूहळू स्वतःचं पुस्तक वाचता आलं पाहिजे.त्यामुळे बैठकीच्या रात्री गटागटामधून महिला लिहा-वाचायला शिकतायत आणि शिकंवतायत असं छान दृश्य बघायला मिळतं."
५८                आम्ही बी घडलो।