पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

थोडी तरी कमाई करता आली पाहिजे असं उजाताईंना वाटलं. त्यांनी मग दोन कोर्स केले - एक बालवाडीचा आणि एक आरोग्यसेविकेचा. बालवाडीचा कोर्स केल्यामुळे गावातल्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून शिकवायाला लागल्या.
 'हक्काची कमाई झाली, बास झालं 'असा स्वतःपुरताच विचार करून उजाताई थांबल्या नाहीत.सामाजिक कामाची त्यांना पहिल्यापासूनच आवड, त्यामुळे आरोग्यसेविका म्हणून त्या मोठ्या आवडीने काम करतात. कोणत्याही चांगल्या कामासाठी त्या कुणाची वाट बघत नाहीत. सहलीचच उदाहरण ध्या-सहलीसाठी बस ठरवायला बस डेपोत जायचं, तर 'दोघीच कशा जाऊ ? चौकशी कशी करू?' म्हणून त्या अडून बसल्या नाहीत. 'देवानं तोंड दिलंय की,' असं म्हणून पुढाकार घेऊन त्यांनी सगळं ठरवलं. या वागणुकीमुळेच गावात त्यांना सगळ्यांचं प्रेम आणि विश्वास मिळालेला आहे.
 प्रबोधिनीने महिलांची सहल दिल्लीत काढली होती. या सहलीला जाऊन त्या दोघींना खूप शिकायला मिळालं. दिल्ली सहल गावातही खूप गाजली. महिलांचे गट दिल्ली सहलीला गेले हे ऐकून - पाहून वरव्यात भराभरा गट सुरू झाले. एक-दोन-चार-चौदा ते थेट बावीस पर्यंत आणि ते सुद्धा २वर्षात. गट एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे असे साखळीसारखे पसरत गेले.
 वरव्याच्या गटांचं हेच तर वेगळपण आहे, तिथेबहुतेक सगळ्या गटांची तारीख आणि वेळ एकच आहे. आपापल्या घरचं आटपून सगळ्या गटांच्या महिला एकाच वेळी पण वेगळ्या ठिकाणी गटाचं काम सुरू करतात. स्वत:च्या 'अचानक बचत गटाची बैठक थोडी लवकरच आटपून उजाताई, आणि त्यांच्याचसारख्या गावाच्या भल्यासाठी झटणाऱ्या गंगूताई अशा दोघीजणी गटागटांवरजातात. प्रत्येक गटाचे हिशोब कॅलक्युलेटर' च्या मदतीनंतपासून
तुम्ही बी घडाना ॥              ५७