पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुशीतलं गाव म्हणून गावकयांनी इथं संस्थेच्या मदतीनं शेतीसाठी बांध बांधून पाणी अडवण्याचं आणि पाणी जिरवण्याचंही काम केलेलं आहे.. त्यामुळेच फॉरेस्टचे अधिकारी वनीकरणाची योजना घेऊन गावात आले. योजना गावात द्यायची तर आधी मिटींग लावून योजनेची माहिती सांगितली पाहिजे,म्हणून गावातल्या पुरूषमंडळींशी बोलणे केले. त्यावर पुरूषमंडळी म्हणाली- 'आमच्या गावात बाप्ये नाय जमत . बायाच गटासाठी म्हणून जमत्यात. बाप्यांना बोलावलं तर कुनीच जमायचं नाय, त्यापरीस बायांनाच बोलवा, ' सरकारी अधिकारी चकीतच झाले. 'गावातले कर्ते सावरते बाप्ये जमत नाहीत, तर घराबाहेर न पडणाऱ्या बाया काय जमणार आणि त्यांना काय समजणार. तरीसुद्धा घरोघर बोलावणी पाठवली. आणि काय नवल, १५-२० मिनिटात ३०-४० जणी जमल्यासुद्धा. त्यांच्याशी बोलताना सरकारी अधिकारी यांना अजूनच धक्का बसला. सगळ्याजणी व्यवस्थित बोलत होत्या. विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरे देत होत्या. गावातल्या कामांची त्यांना माहिती होती. 'ज्या गावातल्या महिला एवढ्या हुशार तिथं योजना नक्कीच चालणार. 'असं म्हणून अधिकाऱ्यांनी गावासाठी योजना मंजूर करून टाकली. गटानंच त्यांना गावासाठी पुढाकार घेण्याची हिंमत दिली.
गावाला लागलं गटाचं वळण
चांगलं काम करायलाही धाडस लागतं!
  महिलांच्या विकासाची चर्चा सुरू झाली की दारूबंदीचा प्रश्न नेहमी ठरलेला असतो. पण आंदोलन करून हा प्रश्न तात्पुरताच सुटतो बंदी कायम टिकत नाही.
 असंच झालं खोपीमध्ये! एकजणाने हातभट्टीची दारू विकायला सुरूवात केली. बातमी गावभर पसरली. सायऱ्यांजणींनी बैठक घेतली. दारू
तुम्ही बी घडाना॥               ५५