पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विक्री करणाऱ्याला जाऊन भेटायचं ठरलं. सकाळी काही जणी जमल्या.. जमल्या तेवढ्या सगळ्या बायकांनी त्याची गाठ घेतली. त्याला समजून दिलं - पुन्हा गावच्या हद्दीत दिसायचंनाही असंखडसावलं. याचा नक्कीच में उपयोग झाला. गावात महिलांची रात्री पुन्हा बैठक बसली सकाळी हजर नसणाऱ्यांची हजेरी घेतली, पैशाच्या फायद्यापुरतं गटात यायचं असलं । तर खाती बंद करा असं त्यांना गावातल्या प्रमुखांनीच सांगितलं. न गेलेल्या सभासदांना खूपच अपराधी वाटलं. कधी चांगलं काम करायलाही धाडस लागतं. एकटी दुकटीनं न जमणारं काम अनेक गटांमुळेच जमतात.
देवाला साकडं
 कुसगावात काकड आरतीचे दिवस आले तरी बाया आरतीला जमेनात. २ दिवस झाले मग गावातल्या पुढाऱ्यांची गटप्रमुखांची बैठक घेतली. “का आरतीला येत नाही?" असं विचारलं. गटप्रमुखांनी एक मुखानं उत्तर दिलं, “महिनाभर गावातले दारूधंदे बंद झाले तरच आम्ही आरती करू," पुढाऱ्यांनी मान्य केलं. पहाटेची काकड आरती सुरू झाली. कधी कधी देवालाही असं साकडं घालावं लागतं, तरच तो पावतो.
आमची ताकद ! गटाची ताकद !!
 यकटी दुकटी नव्हं, वरव्यातल्या ५६ जणीनी दोन दिवस रत्नागिरी, पावस, डेरवण, अशी कोकणची सहल स्वतःची पदरमोड । करून काढली. यात खरं नाव म्हणाल तर तिथल्या उजाताई शिंदे आणि गंगूताई भोरडे यांचं. त्यांनीच कुठं जायचं, कधी जायचं ते सारं ठरवलं. हिंमत धरून दोघीच बस डेपोत गेल्या आणि आख्खी बस प्रवासासाठी ठरवून आल्या.
 वरवे गावात रहाणाऱ्या उजाताई शिंदे यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालेलं. १०-१५ वर्षांपूर्वीच दारूड्या नवऱ्याशी पटत नाही म्हणून लहान लेकीला घेऊन उजाताई माहेरी वरवे गावात आल्या. स्वत:च्या हिंमतीवर ।
५६                 आम्ही बी घडलो।