पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुढं झाली आणि तिनं चारचौघींसमोर सरूचं धुतलेलं धुणं चिखलात । टाकलं आणि म्हणाली "तुझ्या पोराचं पण त्यानंच भलं होणार आहे. गटाचा नियम आहे!".
 गट नसता तर कुणा एकीची अशी हिंमत झाली नसती. पण गटामुळे । चांगलं करायला पण बळ मिळतं. एका दुकटीनं न जमणारं काम गटामुळे सहज जमतं.
गटाची उचल गावाला
 गटातल्या महिला अडीनडीला गटाकडून उचल घेतातच, त्यात नवल ते काय?पण हळूहळू गटाची ताकद वाढायला लागली. गटाच्या हातात पैसे खेळायला लागले. तशी गावांची गटाकडे पाहण्याची नजर ।। बदलली.
 तोरणा किल्ल्याच्या कुशीतल्या गावात दर वर्षी होणाऱ्या जत्रेची - तयारी करताना गावकीला लक्षात आलं की बाजाची पेटी(वाजवायची) घ्यायची तर पैसे कमी पडत आहेत. मग मदत मागायची कुणाकडे? तर । गटाचं नाव डोळ्यापुढं आलं.' गावच गटाला म्हणतोय ५००० रु. द्या. ८ ॥ महिन्यात व्याजासह परत देतो. महिलांनी चर्चा करून द्यायचं ठरवल। आहे, बघूयात प्रत्यक्षात काय होतय ते?
ससेवाडी बदलाची कहाणी !
 ऐका मंडळी! सुनांनो-सासवांनो, पोरीबाळींनो, समद्यांनी । ससेवाडीची कहाणी ऐका. डोंगराच्या कुशीतलं ससेवाडी गाव तसंचांगलं । पण तरीसुद्धा अडलं नडलं सावकारीनं! गावात सावकार यायचे "तुला । किती?" म्हणून विचारायचे, सगळ्यांना पैसे वाटायचे. नुसते नाय बरका, चांगले१०% टक्कयांनं.
 त्यामुळे जेवढी उचल घ्यावी तेवढा कर्जाचा डोंगर मोठा होणार,
५२                आम्ही बी घडलो ।