पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गट भरतो चावडीवर
 गावाची चावडी म्हणजे सगळ्या बाप्यामंडळींचं एकत्र जमण्याचं । ठिकाण. गावातल्या ठिकठिकाणच्या बातम्या, घडामोडी या चावडीवरून । गावात पसरत असतात.असं हे खास गावाच्या हक्काचं ठिकाण. वेल्हे है । तालुक्याचं गाव. तिथं गट सुरू झाले. गटाची बैठक घ्यायची कुठे? चर्चा । सुरू झाली. पुरेशी जागा असलेलं, सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणज । चावडी. ताईंनी सुचवलं 'चावडीवर जमूया. 'बया असं कुठं झालंया? । बाया मान्सं अन् चावडीवर? आजवर कधी कुनी असं केलंया?' असे । उद्गार महिलांकडून निघाले. "पण सगळ्याजणींनी मिळून, सोय म्हणून । बसायला काय हरकत आहे?" ताईंनी विचारलं बऱ्याच वेळानं काही । जणींची हिंमत झाली. “चावडी काय कुनाच्या मालकीची नाय. आन् आना चांगल्या कामासाठीच जमनार !" असं म्हणत काही जणी ताईंबरोबर । निघाल्या. त्यांचं पाहून बाकीच्यांनाही धीर आला. आणि दुसरी सोयीची। जागा मिळेपर्यंत म्हणजे जवळजवळ वर्षभर महिला गटासाठी चावडीवर । जमत राहिल्या. चावडी सगळ्या गावाची म्हणजे महिलांचीसुद्धा. है । समजायला उमजायला लागलं गटातूनच.
मंदिर सगळ्यांना खुलं
 एका गावात मंदिरासमोरून महिलांनी चपला घालून जायचं नाही । असा नियम होता. मात्र हा नियम गावातल्या पुरूषांना लागू नव्हता. त्यामुळे महिलांची वर्दळ मंदिरापाशी कमीच. गटाची बैठक देवळात व्हायला । लागली आणि महिला नियमितपणे देवळात जायला लागल्या. फक्त । महिलांनीच चप्पल न घालण्याची पद्धत सोडून देण्याची हिंमतं या । बैठकांतून महिलांमध्ये हळूहळू आली, आणि आता गावकरीही त्याला । सरावले.

३६                  आम्ही बी घडलो।