पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गटातून बळ मिळवणाऱ्या कितीतरी जणींना, गावोगावी गट पसरावेत अशी ओढ लागली. ती प्रगट झाली अशा गाण्यातून ..
बचत गट आपण सुरु करू गं
  आया बायांना आपण जाऊन सांगू ग ।
  बचत गट आपण सुरू करू गं ।। धृ ।।
आपण साऱ्या मिळून जमू, मिळून सारे नियम करू
असाच व्यवहार कराया आपण शिकू गं ।
बचत गट आपण सुरू करू ग ॥ धृ ॥
  एकत्र बसूनी बचत करू, चार चौघींची गरज भागवू ।
  हितच बसून आपण हिशोब करू गं ।
  बचत गट आपण सुरू करू गं ॥ २ ॥
व्याजाचा दर थोडाच धरू, सावकार मारवाडी माघारी फिरवू ।
हितच आपण वाटप लेखी करू गं।
बचत गट आपण सुरू करू गं ।। ३ ।।
  हजाराची फेड दोनशेनं करू, पाच महिन्यात पुरी करू ।
  उरावरला भार हलका आपण करू गं ।
  बचत गट आपण सुरू करू गं ।। ४ ।।
वीस जणींच्या नावावरी, कर्ज आपण काढूनशानी।
उद्योगधंदा आपण सुरू करू गं।
बचत गट आपण सुरू करू गं ।। ५ ।।
  कर्ज आपण वाटून घेऊ, हिशोब त्याचा करुन घेऊ।
  शिल्लक किती राहिली आहे सांगू गं।
  बचत गट आपण सुरू करू गं ।। ६ ।।
सर शेवटी हिशोब झाला, कागद जमा खर्चाचा झाला ।
कागद काढून निरोप आपण घेऊ गं।
पुढच्या महिन्याला ११ तारखेला येऊ गं ।।७।।

२४               आम्ही बी घडलो ।