पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांचं सगळ्यांमधी येणं-जाणं सुरू झालं. नायतर त्या बी घरातच अडाणी हायल्या असत्या."
 चार वर्षांपूर्वी घराबाहेर न पडणाऱ्या, मान खाली घालून चालणाऱ्या वनशीवबाईंची हिंमत येवढी वाढली की, त्यामुळं केवळ स्वतःपुरता विचार न करता, त्यांच्यासारख्याच चार जणींचा विचार करायला त्या शिकल्या. त्यांना गटातून मिळालेलं बळ त्यांनी अजून दहाजणींपर्यंत पोहचवलं.

गटातून मिळाली माहितीची ताकद

 कातवडी तसं अगदी छोटंसं गाव. बाहेरच्या जगातल्या घडामोडी- बातम्या तिथं कधीतरीच पोचतात. गावात गट सुरू झाले आणि बाहेरच्या जगाची झुळूक कातवडीत यायला लागली. कातवडीतली राधाबाई तर तालुक्याच्या गावी गटांच्या बैठकींना, मेळाव्यांनासुद्धा जायला लागली. नवीन ओळखी- पाळखी व्हायला लागल्या. त्यातच राधाबाईला कळलं की जवळच्याच गावातल्या रखमाबाईनं घर बांधायला काढलं. रखमा तिच्यासारखीच गरीब परिस्थितली. घर बांधावं हे तर राधाबाईंचं सुद्धा कितीक दिवसाचं स्वप्न, पण जमायचं कसं? तिनं रखमाबाईला विचारलं- कसं गं जमवलंस? तिनं सांगितलं की त्यांच्यासारखी परिस्थिती असणान्यांसाठी सरकारची घर बांधणी योजना आहे. त्यातून मिळणाऱ्या मदतीमुळेचरखमानंघर बांधायचं धाडस केलं. रखमाचं ऐकून राधाबाईलाही उभारी आली. तिनंपण त्या योजनेची माहिती करून घेतली, आणि इतके दिवस स्वप्न असलेला विचार प्रत्यक्षात यायची चिन्ह दिसायला लागली!
 गटात येण्याआधी राधाबाईला अशी कुठली योजना असते हेच माहीत नव्हतं त्यामुळे मनातली गोष्ट सोडून द्यावी लागत होती. गटानं राधाबाईला सांगावा दिला तो हाच माहितीच्या ताकदीचा! त्यातून जगण्याची उभारी वाढवण्याचा.

तुम्ही बी घडाना ॥               २३