पान:आमची संस्कृती.pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५० / आमची संस्कृती

५. नागा जमाती, सेमा, आवो, अंगामी, कोन्याक वगैरे - नागा टेकड्या. आसामची पूर्वसीमा.

६. मिश्मि- नॉर्थ ईस्ट फ्राँटिअर एजन्सी, मिश्मि टेकड्या; ७,००० फूट उंच.

बिहार
१. मुसाहर- (भुइआपैकी असावेत) उत्तर बिहार, चंपारण, मुझफरपूर जिल्हे, नेपाळच्या सरहद्दीपाशी. बहुतेक दक्षिण बिहारमधून तिकडे मजूर म्हणून नेलेले असावेत- जसे आसामच्या चहाच्या मळ्यांतून आज लोक जातात त्याप्रमाणे.
२. उरांव (साडेसहा लाख)- गुलाम लोहारडगा, रांची, मुख्यत्वे रांची जिल्हा.
३. मुंडा (पाच लाख)- दक्षिण रांची, खुटी तालुका.
४. खाडिया- दक्षिण बिहार (नेतरहाटचे डोंगर).
५. अगारिया- सुंदरगड (ओरिसा) आणि दक्षिण रांची (बिहार.)
६. सवरिया पहाडिया आणि,
७. माल पहाडिया- संताळ परगण्यालगतचा डोंगराळ भाग.
८. संताळ (आठ लाखांवर)- संताळ परगणा व त्यालगतचा प्रदेश.
९. हो (साडेतीन लाख)- सिंगभूम जिल्हा, कोलहान.
१०. थारू- चंपारण.

मध्यप्रदेश
१. अगारिया- ओरिसा सीमेजवळ,
२. गोंड- छिंदवाडा, बैतूल, होशंगाबाद, निमाड, रायपूर, मांडला, माडिया गोंड-बस्तार.
३. हळबा- रायपूर. ,
४.खाडिया- दक्षिण बिहार, उत्तर ओरिसा व लगतचा मध्यभारत.
५. उरांव- सुरगुजा.
६. बैगा- दक्षिण मध्यप्रदेश.
७. कोरवा ऊर्फ कोरकू- मध्यप्रदेश, सुरगुजा.