पान:आमची संस्कृती.pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ४९


प्रांतातील वन्य व वन्येतर मुलांचा मेळावा करून त्यांना विशाल भारताच्या दर्शनास न्यावे. प्रांतिक भाषा व संस्कृती या पायरीवरून त्यांना भारतीय बनवण्याचा उद्योग व्हावा. वन्य म्हणून निराळी जमात उत्पन्न करून भारतात नव्या भिंती उभारण्याचा उपक्रम शक्य तितक्या लवकर टाकून द्यावा.

 टीप: निरनिराळ्या प्रांतांतील आदिवासींची वस्ती सार्वत्रिक नसून प्रांतांच्या काही विशिष्ट विभागांतच आढळते. बहुतेक करून डोंगराळ जंगली विभागात यांची वस्ती आढळते. निरनिराळ्या प्रांतांतील मुख्य मुख्य वन्य जमाती व त्यांची वसतिस्थाने खालीलप्रमाणे आहेत

आंध्रप्रदेश

१. चेंबू- महबूबनगर व उत्तर कर्नूल जिल्ह्यांतील नल्लमलै डोंगर व तेथीलच कृष्णाकाठची अरण्ये.
२. गोंड (दीड लाख)- आदिलाबाद जिल्हा.
३. कोया.
४. कम्मर- बोरगम पहाड तालुका व भद्राचलम ते जवळजवळ राजमहेंद्रीपर्यंतचा गोदावरीचा प्रदेश.
५. कोंडा रेड्डी- भद्राचलम व बोरगम पहाडमधील गोदातट.
६. सवरा- गुम्मलक्ष्मीपुरम, सीतम पेटा (श्रीकाकुलम जिल्हा.)
७. गदबा.
८. कोंडा दोरा- उत्तर आंध्र व दक्षिण ओरिसा.
९. बोगता- चिंतापल्ली.
१०. यानाडी- मध्य आंध्रात कृष्णेच्या तीरावर समुद्रापर्यंत.
आसाम

१. खासी,
२. सिंटेंग- खासी व जयंती टेकड्या.
३. काचरी- गोलपारा, कामरूप, डारांग, भूतानच्या डोंगराच्या पायथ्याशी.
४. मिकिर- नवगंज व सिवसागर जिल्ह्यांमध्ये मिकिर डोंगर आहेत, त्याच्या उतारावर.