पान:आमची संस्कृती.pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३८ / आमची संस्कृती

मासिके. या दोहोंतही अभिजात कलेचा व वाङ्मयाचा आविष्कार फारच थोडा असतो. उत्तान शृंगार, उथळ प्रणय व पोरकट संवाद हेच बहुतांशी आढळतात. या सर्वांचे अनुकरण मुले करीत असतात. त्यांच्या वागण्यावरून ती जितकी वाहवत गेली आहेत असे वाटते, तितकी ती सुदैवाने नसतात. हल्लीच्या पिढीत जर काही कमी पडत असेल तर ते हाताने करावयाचे काम. शहरात तर मुलगे काय व मुली काय शारीरिक कष्टाच काम करीत नाहीत किंवा त्यांना तसले काम पडत नाही. त्यांचे आईबापही असली कामे सहसा करीत नाहीत. भांडी घासण्याला व कपडे धुण्याला बाई असते. दळणकांडण घरी नसते. घरोघर नळ असल्यामुळे विहिरीतून पाणी ओढावे लागत नाही. त्यामुळे बायकांचे शारीरिक कष्टाचे काम कमा झाले आहे. पांढरपेशा पुरुष तर ऑफिसात बसूनच काम करतो. घराहा कष्टाचे काम काही नसते. मित्रमंडळीत गप्पा पत्ते, करमणुकीचे वाचन, क्वचित भाजी आणणे हेच बहुतेक पुरुषांचे जीवन असते. काही देशभक्त इतर कष्टाची कामे करतात, पण त्या कामांचा त्यांच्या स्वत:च्या जीवनाशी व कुटुंबांशी कार्यकारणसंबंध नसतो. दिवसभर डोक्याचे काम करण्याइतकी तयारी नसते व वेळ जाण्यास दुसरे साधन नसल्यामुळे निष्फळ वाचन मात्र बरेचसे होते. शाळेतूनही घरी करण्यासाठी अभ्यास देण्याची प्रथा मोडत चालली आहे असे वाटते. जे करण्यास कष्ट पडतात, असे काही न करता लघुकथा वाचण्याकडेच प्रवृत्ती जाते किवा संध्याकाळी सिनेमा बघावासा वाटतो. फारच झाले तर रेडिओ घरी असता तर तो लावून त्याच्यापुढे बसावयाचे. हल्लीच्या करमणुकीच्या प्रकार केवळ प्रेक्षकांच्या भूमिकेवरूनच करमणूक करून घ्यावयाची असते. ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या मुक्त पुरुषाप्रमाणे कर्मेंद्रिये सर्वथा स्वस्थ असतात. हात हालचाल करीत नाहीत. पाय आसनस्थ असतात.ज्ञानेंद्रिये व मन स्वस्थ नसते. स्वत: कुस्ती खेळणारे दहा तर बघे हजार क्रिकेट खेळणारे बावीस तर बघणारे, वाचणारे व रेडिओवरून ऐका' दहा हजार, असा प्रकार असतो. दर वर्तमानपत्रात आंतरप्रांतीय व आंतरराष्ट्रीय क्रीडापटूच्या खेळांच्या बातम्या, वर्णन व फोटो देणारे एक तरी सदर असतेच. सिनेमात दिसणारी गोड सृष्टी, स्वानुभवान थोड्यांच्याच वाट्यास येते. पण पाहता पाहता आपल्याला नायक व