पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपोद्घात
--------------------------------


क्षुधा आणि कामवासना या मनुष्याच्या आणि बऱ्याच इतर प्राण्यांच्याही आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यांपैकी अधिक महत्त्वाची कोणती याचा विचार केल्यास असें दिसतें की क्षुधा नसल्यास मनुष्य खाणार नाही आणि जगणार नाही, तेव्हा मग कामवासनेचा प्रश्नच उरणार नाही. तेव्हा क्षुधेला निर्विवाद अधिक महत्त्व आहे.परंतु कामवासनेचा संबंध केवळ व्यक्तींशीच नव्हे तर संतातीशी,म्हृणजे मनुष्य जाति जगांत कायम राहण्याच्या उपयाशी असल्यामुळें,या दृष्टीने कदाचित कामवासनेला अधिक महत्त्व द्यावे लागेल.तथापि या करता देंखील मनुष्य प्रथम जिवंत राहिला पाहिजे. इतकेंच नाहीतर तो सुद्द्ढ असल्याशिवाय संतति चांगली होणार नाही,आणि योग्य आहाराशिवाय प्रकृती सुधृढ राहृणार नाही. तेव्हा या दृष्टीनेही क्षुधेलाच अधिक महत्त्व द्यावें लागते. ‘आधुनिक कामशास्त्र’ या पुस्तकात कामवासनेचा विचार केलाच आहे.आतां त्यापेक्षाही महत्त्वाचे जें आहारशास्त्र त्याचा विचार या ग्रंथात करूं. अर्थात हा विचार शास्त्रीय पद्धतीने, म्हणजे पूर्वग्रह बाजूला ठेवून,करायचा आहे हे वाचकांनी विसरू नये.



-

--------------------------------