पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र

प्रकारची फळे , आणि पहिल्या वर्गांत नसलेल्या सर्व भाज्या. ३. कनिष्ठ दर्जाच्या प्रोटीनचे पदार्थ म्ह्णजे कोंडा काढून पांढरे स्वच्छ केलेले तांदूळ,कणीक,मका वगैरे. आणि ४. प्रोटीन बिलकुल नसलेले पदार्थ, म्हृणजे साखर, प्राणिजन्य चरबी, आणि वनस्पतिजन्य तेले.

 आपल्या अन्नात सर्वपदार्थ पहिल्या वर्गांतीलच असले पाहिजेत असे नाही. हेपदार्थ सामान्यत: महाग असतात व शिवाय पहिल्या वगोंतील कांही पदार्थ घेतल्यास दुसऱ्या व तिसऱ्या वगोंतील पदार्थंही त्यामुळे अंगी लागण्यास मदत होते. मात्र काही पदार्थ पहिल्या वर्गातील असावे, कारण ते नसल्यास शरीराची वाढ योग्य रीतीने होणार नाही. हिंदुस्थानात मुलांना हे पदार्थ भरपूर मिळत नाहीत, व कांहीना मुळीच मिळत नाहीत, म्हणून ती अशक्त होतात.

 अन्नात प्रोटीनचे प्रमाण काय असावे यासंबेघी राष्ट्रसंघाने नेमलेल्या कमिटीनें अशी माहिती प्रसिद्ध केली आहे की वाढ पुरी झालेल्या मनुष्याच्या अन्नात प्रोटीनचे प्रमाण किमानपक्ष शरीराच्या वजनाच्या एक हजारांशपेक्षा कमी असू नये, ते भिन्नभिन्नपदार्थांतून आलेले असावे आणि त्यापैकी निदान कांही भाग प्राणिजन्य असावा. वाढीच्या वयांत प्रोटीनचे प्रमाण पुढीलप्रमाणे असावे.वजनाचें माप ग्रॅम हें धरले आहे (१ पौंड म्हणजे ४५३ ग्रॅम)आणि शरीराच्या वजनाशी प्रमाण दिले आहे. एक ते तीन वर्षांच्या वयांत अन्नातील प्रोटीनचे शरीराच्या वजनाशी प्रमाण दरहजारी साडेतीन असावे,तीन ते पांच या वयांत हजारी दोन, ५ ते १५ पयेंत हजारी अडीच, १६ ते १७, हजारी २, १७ते २१, हजारी दीड, आणि त्यापुढे हजारी १ ग्रॅम असावे’.
 गरोंदर स्त्रियांचे बाबतीत पहिल्या तीन महिन्यांत हजारी १ म्हणजे इतर माणसांप्रमाणेंच, पुढल्या सहा महिन्यांत हजारी दीड आणि अंगावर मूल पाजण्याच्या काळांत हजारी २ असे प्रमाण असावे.
  हे किमान प्रमाण आहे,परंतु ते याचे सवापट असल्यास अधिक बरे (लकॉक),पण ते दोडपटीपेंक्षां जास्त असतां नये.
 प्रोटीनसंबंधी हे विशेष लक्षात ठेवण्यासांरखे आहे की ते प्रमाणांत खाल्ला

२८