अनुबंधन. कर्मेद्रियनिग्रहश्रवणाव्यतिरिक्त सर्वविषयकर्मनिवृत्ति सर्वेद्रियांचे बहि- ापार आटोपून मनासह स्थिर करणे यास दम म्हणतात. शीतोष्णादिक द्वंद्वसहन, सुग्वदुःख मनांत पण न येणे, जे काळी में में प्राप्त तें तें प्रीति- द्वेषरहित भोगून सुटणे ही तितिक्षा होय. विहितैकर्माचा विधियुक्त त्याग वेदान्तश्रवणादिकांवांचून अन्य सर्वकर्मसमाप्ति विषयेच्छेने कोणतेच कर्म न करणे, ही उपरति होय. वेद, शास्त्र, ईश्वर, गुरु, यांचे वाक्यांवर पूर्ण विश्वास, निष्कपट अंतःकरणाने भक्तिभावनिश्चय ही श्रद्धा म्हटली आहे. विषयाकडून निरंतर मनेंद्रिये आवरणे. जे जे काळी मनेंद्रिये विषयाकडे जातील ते ते काळी मिथ्यत्वें विषय दोषदृष्टीने त्याग करून पुनःपुन्हा आत्मत्वीं एकनिष्ठा राखणे यास समाधान म्हणतात. अशी सहा मिळून एक शमादिषट्कसंपत्ति होय व ब्रम्हात्मस्वरूपप्राप्ति सर्व अनर्थनिवृत्ति हे मोक्षाचे स्वरूप लक्षण आहे. तिकडे अति तीव्र इच्छा असणे यास मुमु- क्षुता म्हणतात. एवं विवेकादि चार व श्रवण, मनन, निदिध्यास, तत्पैद- त्वंपर्दै अर्थाचे शोधन ही चार मिळून अष्ट ज्ञानाची साधनें होत. विवेकादिकाविना श्रवण बनत नसून श्रवणादिकांवांचून तत्पदत्वंपदाचें अभेद ज्ञान होत नाही यास्तव विवेकादिक चाहींची श्रवणांत अपेक्षा व श्रवणादिक चाहींचा ज्ञानांत उपयोग आहे आणि विवेकादिक अष्ट अंतरंग व यज्ञादि कर्मे बहिरंग साधनें होत. ज्याचे श्रवणाने ज्ञान होऊन तत्काल सर्वदुःखनिवृत्तिप्रत्यक्षफल होत आहे म्हणून विवेकादिक अष्ट अंतरंगे म्हटली आहेत; आणि ज्या क्रियारूपकर्मानें तत्काल प्रत्यक्ष फल नसून शास्त्रावरून परोक्ष स्वर्गादिक जाणण्यांत मात्र येतात अशी यज्ञादिक कर्मे चित्तशुद्धीने ज्ञान होऊन मोक्ष अशा परंपरा क्रमाने फल देणारी म्हणून बहिरंग होत. ही सकाम्यास संसारहेतु व निष्काम्यास १ सुखदुःख. २ वेदशास्त्रांनी अधिकाराप्रमाणे सांगितलेलें. ३ ईश्वरवाच्य. ४ जीववाचक. ५ जवळची पायरी. ६ दूरचे मार्ग,
पान:आत्मविचार.djvu/२३
Appearance