पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभाव होता. या विभिन्न पंथात असलेल्या संकुचित, अनुदान वृत्तीमुळे वर्ग विशेषाचे समाजावरील प्राबल्य वाढत चालले होते. परिणामी विदेशी धर्मांना आमंत्रण मिळाले. सर्व धर्म नि समाजनाशाच्या उदारवादी, समतावादी धोरण स्वीकारून औरंगजेबासारख्या कर्मठ धर्मप्रसारकापासूनही आपल्या पंथाचे रक्षण केले. धर्म संघर्षाच्या अत्यंत प्रतिकूल काळात महानुभाव पंथाने सर्वसमावेशक असे जे एकात्मवादी धोरण स्वीकारले ते त्याच्या दूरदृष्टीचे जसे द्योतक आहे तसेच ते त्याच्या एकात्मवृत्तीचे ठळक लक्षणही आहे, नि म्हणूनच धर्म नि एकात्मता यांचा आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा महानुभाव पंथाने या संदर्भात केलेले कार्य आपल्या पहिल्यांदा लक्षात येते. महानुभाव पंथ बदलत्या काळात निष्प्रभ झाला, ही वस्तुस्थिती आहे. असे असले, तरी विभिन्नतेने विनटलेल्या या देशास अभिन्नतेच्या सूत्राने बांधून एकात्म ठेवण्याचे आरंभिक श्रेय जर कुणाला द्यावयाचे झाले तर ते महानुभाव पंथासच द्यावे लागेल, हे वेगळे सांगायला नको.

आकाश संवाद/७८