पान:आकाशगंगा.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'स्त्री' बनुनी मासिकांत कविता जरि धाडिल्यात बिंग फुटुनि दशदिशांत होय मात्र देना ! पैसा मम खर्चुनीच काव्यग्रंथ छापण्यास विनविलें प्रकाशिकेस ( 'ज्ञानागर' मुंबइचें निवडीना मम ' वेंचे ' अन् प्रो. 'हिज् मास्टर'च परि रुकार दे ना ! गान मम करेना | सतत मिळविण्यास नांव धडपडतो तरि न वाव कवितेची कठिण हांव - अजुनही जिरेना ! ६ ' हा नाद सोड सोढ' मित्र करिति बोध गोड मरणाविण दुष्ट खोड जायची कधीं ना ! HIM