पान:आकाशगंगा.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ते चित्र पहा - - -२- कवि आणि मर्कट 44 बोले खाउनि दांत सर्व कविला गर्ने कुणी मर्कट- 'माझे साम्य तुझ्यामधें प्रकटते हैं व्यर्थ ना तर्कट ! दोघेही दिसण्यांत एक अगदीं । आश्चर्य कोठें न कीं आम्हांपासुनि जाहलीच तुमची उत्पत्ति साग्या जगीं ! उद्यानीं फिरतां फळे खुडुनियां पोटामधें घालतों तूंदी चोरुनि शब्दवैभव तसे काव्यामधें कोंबतो ! आहे पुच्छ म्हणून मी करितसँ उड्डाण चोहींकडे कीर्ती-पुच्छ मिळूनि ना मिरविशी प्रौढी जनांच्यामधें ? वांकोल्या मज दावितांच चिडतों अत्यंत रागावुनी टीका हो तुझियावरी तर कसा जातोस फेंदारुनी १ झालें कांहिंतरी विषाद न मुळीं त्याचा कधीं मानतां 'माझे x x x लाल ' - तत्त्व अपुले वारूनि नेई व्यथा ! " प्रकाशन – विविधवृत्त -

" दोस्ता ! हे सगळे खरें, कवि वदे, मी ना सुखी अल्पही टाकी टर्फल ना कुणी मजपुढें खाऊनियां शेंगही !! " - वृत्त - शार्दूलविक्रीडित - - १९- - -