पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि वाट्याला आलेलं आयुष्य ती सगळ्यांसारखं प्रवाहपतित होऊनच जगली?
 फार मागे एकदा माझं आणि आईचं ॲलिसबद्दल बोलणं चाललं होतं, तेव्हा आई म्हणाली होती, "तिच्याबद्दल तुला इतके प्रश्न का पडतात? बहुतेक माणसं साधी सरळ असतात. ती आपल्याला नीट कळली नाहीत की त्यांच्यात फार गुंतागुंत आहे असं वाटायला लागतं."
 कुणास ठाऊक, तसंही असेल.

- ★ -

उज्ज्वला – ६५