पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नंतर एकदा भेटल्यावर त्यानं मला विचारलं, "तू असं का केलंस?"
 "हा प्रश्न मी तुला विचारणं जास्त योग्य होईल नाही का ?"
 "म्हणजे तुला काय म्हणायचंय ?"
 "ते तुला चांगलं माहीत आहे. उगाच वेड पांघरू नको. आता तुझं लग्न झालंय रूसी."
 "मी कुणाला दुखवीत नाहीये."
 "हे ॲलिसला विचारल्याशिवाय मी स्वीकारू शकत नाही."
 "तू सांगणारेस तिला ?"
 मी शांतपणे म्हटलं, "तिला सांगणं हे माझं काम नाही. मला तुला फक्त एवढंच विचारायचंय की, तू तिच्याशी लग्न केलंस तरी का? आणि आता केलंयस तर मग अशी बेइमानी का ?"
 रूसीनं माझ्याकडे खिन्नपणे पाहिलं. "तू इतका साचेबंद विचार का करतोस ?"
 "छान ! म्हणजे तसं काही कारण नसताना तिच्याशी लग्न करणं हे साचेबंद नाही, पण ह्या तूच निर्माण केलेल्या नात्याची चाड बाळगून इतर बायकांना फिरवणं सोडावंस अशी अपेक्षा करणं साचेबंद !"
 "सगळं इतकं सरळ नसतं डिगी. तुला माहीत आहे घरात काय परिस्थिती आहे ती. मला वाटलं होतं की, फ्रेनी हळूहळू निवळेल, पण त्याचं काही चिन्ह नाही. ॲलिस सुस्वभावी आहे, पण फ्रेनीचे हल्ले मुकाट्याने खालमानेनं ऐकून घेणाऱ्यातली नाही. मग सतत कुरबुरी, टेन्शन. हिनं तिच्याबद्दल तक्रारी सांगायच्या, तिनं हिच्याबद्दल. रणांगणच असतं. माझा विचार कुणीच करत नाही. असह्य झालं की, मी घरातनं बाहेरच पडतो. परवा असाच कुठेतरी भरकटत असताना ज्यूली भेटली. त मला पाह्यलंस त्या दिवशी कितीतरी दिवसांनी मी एक निवांत संध्याकाळ आनंदात घालवली. ताणतणाव नाहीत, फालतू अपेक्षा नाहीत, आरोप-प्रत्यारोप नाहीत.

दिग्विजय – ५१