पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रहाणार असं धरून चाललो असताना एकदम त्यात ॲलिसने प्रवेश केला.
 आता ती कधीच दिसणार नाही. तिचं ते झपाझप चालणं, मिस्किल स्मित, खिंकाळतं हास्य, तिच्या अफलातून गप्पा हे सगळं नाहीसं होणार आहे. तिच्याशिवायचं जग एका नीरस, अंधाऱ्या, कुंद कोठडीसारखं होणार आहे.
 स्वतःची गरज निर्माण करून मग स्वतःला माझ्यापासून काढून घेण्याचा तिला काय हक्क होता ?

- ★ -

रॉबर्ट – ४३