पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "तू अगदी गंभीरच झालीस."
 "ही गोष्ट माझ्या दृष्टीने गंभीरच आहे."
 काही दिवसांनी मी पुन्हा ह्या विषयाला हात घातला तो तिची क्षमा मागण्यासाठी.
 "मी त्या दिवशी असं बोलायला नको होतं. मला तुझ्या प्रकृतीविषयी माहीत नव्हतं. तू काही बोलली का नाहीस?"
 "माझ्या प्रकृतीचा काय संबंध होता आपल्या संभाषणाशी ? आपण माझ्या मेडिटेशनबद्दल बोलत होतो आणि तू त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होतीस. तुझं मत आता बदललंय का ?"
 "नाही, पण ....."
 "नाही ना ? मग हा विषय आता संपलाय."
 "तरी तुला कॅन्सर झालाय हे तू का बोलली नाहीस हा प्रश्न रहातोच."
 "तसा प्रसंग आला नाही म्हणून बोलले नाही. गळ्यात एक पाटी अडकवून हिंडायला पाहिजे का मला कॅन्सर झालाय म्हणून ?"
 तिनं दार धाडकन लावूनच घेतलं होतं. आपण लवकरच मरणार हे कळून चुकल्यावर तिचं चित्त विचलित झालं असलं पाहिजे. पण तिला कुणाचीच, माझीसुद्धा सहानुभूती नको होती. तिला काय शारीरिक, मानसिक दुःख होत असेल त्याच्यावर उतारा म्हणून तिनं वेगळाच मार्ग शोधला होता. अर्थात मी असं म्हटल असतं तर तिनं ते कबूल केलं नसतं. तिच्यात असं काही होतं की, जे धरून ठेवायला गेलं की, निसटून जायचं. ती कुणाला तरी गवसली होती का?
 ॲलिस माझ्या जीवनात फार उशिरा आली, आणि मला तिचा सहवास अधूनमधून तुकड्यातुकड्यांनी लाभला. तरीही तिच्यामुळे माझ्या आयुष्याचा पोतच बदलला. उरलेल्या आयुष्यात आता काही उलथापालथ न होता ते आहे असंच संथपणे चालू

४२ - ॲलिस